तरुण भारत

मंगाई मंदीर परिसरात ड्रेनेजचे पाणी

भक्तांमधून संताप, मनपाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

बेळगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱया वडगावच्या मंगाई देवी परिसरात ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील महानगरपालिकेकडून कोणतीच उपाय योजना करण्यात आलेली नाही. या दुर्गंधीचा फटका येथे येणाऱया भाविकांना सहन करावा लागत असून, हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी मागणी रहिवासी व भक्तांकडून होत आहे.

मंगाई नगर परिसरात रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लहान डेनेज वाहिन्या कुचकामी ठरू लागल्या आहेत. त्यातच कचरा येवून अडकल्याने डेनेजचे पाणी उलटे वाहू लागले आहे. हे पाणी थेट मंगाई मंदिरसमोरील पटांगणावर वाहत आहे. मागील वर्षभरापासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असले तरी मनपा प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तक्रार केल्यानंतर अधिकारी येतात, पाहणी करतात, निघून जातात. परंतु अंमलबजावणी कोणीच करत नसल्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी दर्शनासाठी व आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदीर परिसरात होते. परंतु या डेनेजच्या पाण्यामुळे या भाविकांना त्या ठिकाणी जेवण करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे तो परिसर सोडुन इतर ठिकाणी जेवण करावे लागत आहे. त्याच सोबत परिसरातील लहान मुले या पटांगणावर खेळण्यास येतात. त्यांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही डेनेजची समस्या सोडवावी, अशी मागणी भाविक करीत आहेत.

Related Stories

शहर परिसरातील खुल्या जागा-मैदाने बनली गैरधंद्यांचे माहेर घर

Amit Kulkarni

एसकेई, विजया क्रिकेट अकादमी संघ विजयी

Amit Kulkarni

वर्षारंभालाच रेल्वे उशीरा

Rohan_P

म.ए.समितीच्या उमेदवारांनाच विजयी करा

Patil_p

जंगल परिसरात गावठी दारू अड्डय़ांवर छापे

Patil_p

कर चुकविणाऱया मालमत्ताधारकांचा शोध घेण्याचा आदेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!