तरुण भारत

सैन्यविमानांचा लस वितरणासाठी वापर

ब्रिटनने उचलले पाऊल : 14 अब्ज डोस पोहोचविण्यासाठी लागू शकतात 2 वर्षे

ब्रिटनमध्ये मंगळवारपासून लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही लस बेल्जियममधून ब्रिटनमध्ये आणण्यात येणार आहे. याच्या वाहतुकीला विलंब होऊ नये याकरता ब्रिटनचे सरकार रॉयल एअरफोर्सच्या विमानांचा वापर करणार आहे. दुसरीकडे जगातील प्रत्येक हिस्स्यात एकूण 14 अब्ज डोस लोकापर्यंत पोहोचविण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे विधान इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने (आयएटीए) केले आहे.

Advertisements

ब्रिटनने नवा मार्ग शोधला

ब्रिटनमध्ये आरोग्य आणि संरक्षण विभाग लसवाहतुकीसाठी मिळून काम करत आहेत. लसनिर्मिती बेल्जियममध्ये होत असून त्यांना ब्रिटनमध्ये आणावे लागणार आहे. पहिल्या खेप अंतर्गत 8 लाख डोस आणले जातील. या डोसच्या वाहतुकीसाठी रॉयल एअरफोर्सच्या विमानांचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य मोहीम 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. युरोपीय देशांमधील अंतर तसेही कमी आहे, परंतु कमी वेळ लागावा म्हणून हवाईमार्गांची निवड करण्यात आली आहे.

ब्रिटन-युरोपीय महासंघात मतभेद

ब्रिटन आणि युरोपीय महासंघादरम्यान बेक्झिटच्या मुद्दय़ावरून तणाव सुरू आहे. परंतु तडजोडीचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटन नाताळापूर्वी स्वतःचे आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना लस देऊ इच्छितो. रस्ते किंवा सागरी मार्गाच्या वापराच्या मंजुरीसाठी अधिक वेळ लागू शकतो. तर युरोपीय महासंघाकडून एकदा मिळालेल्या मंजुरीनंतर विमानोड्डाणे करता येतात. याचमुळे सैन्यविमानांचा पर्याय निवडण्यात आला आहे.

शतकातील सर्वात मोठी मोहीम

कोविड-19 लस जगातील प्रत्येक हिस्स्यात पोहोचविणे या शतकातील सर्वात मोठी मोहीम ठरणार आहे. लसीची सुरक्षा सर्वात मोठे आव्हान आहे. विविध देशांच्या सरकारांना एकत्र यावे लागणार आहे. ही मोहीम अत्यंत अवघड ठरणार असल्याचे उद्गार आयएटीएचे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलेक्झेंडर डी जुनिएक यांनी काढले आहेत.

सर्व मार्गांचा अवलंब

अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने ऑक्टोबरच्या अखेरीस वाहतूक योजना तयार केली होती. लसीला सुरक्षित पोहोचविण्यासाठी सर्व मार्गांचा वापर करू. याप्रकरणी वेग आणि सुरक्षा दोन्ही आवश्यक असल्याचे उद्गार परिवहन सचिव एलेन चाओ यांनी काढले आहेत.

प्रत्येक एअरलाईनचा वापर

लसीला जगातील प्रत्येक देशात पोहोचविण्यासाठी सर्व देशांच्या एअरलाइन्सचा वापर करावा लागणार आहे. प्रारंभिक काळात लसवाहतूक हाताळणे सोपे नसणार, कारण एअरलाइन्स कंपन्यांना याचा अनुभव नाही. एका अनुमानानुसार वर्षाच्या अखेरपर्यंत फायजर 1 अब्ज 30 लाख डोस तयार करणार आहे. मॉडर्ना सुमारे 50 कोटी डोस तयार करू शकेल. एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्डच्या लसीला मंजुरी मिळाल्यावर 2 अब्ज डोस निर्माण होऊ शकतात.

Related Stories

नेपाळमध्ये झटका, चीनचे प्रयत्न सुरूच

Omkar B

कॅनडात भारतीय विद्यार्थिनीला भोसकले

Patil_p

इंडोनेशियातील बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले; प्रवाशांचा शोध सुरू

datta jadhav

मानवी त्वचेवर 9 तासांपर्यंत जिवंत राहतो कोरोना

Patil_p

लंडनचा ट्रेडिंग हॉल ‘द रिंग’ बंद होणार

Patil_p

स्टेरॉयड औषधाने गंभीर रुग्णांचा वाचणार जीव

Patil_p
error: Content is protected !!