तरुण भारत

नव्या गाण्यात शिवानी बावकर- नितीश चव्हाण एकत्र

सजलं रूप तुझं,रुजलं बीज नवं…. उधाण वारं हसतंय धजलं तुझ्या म्होर, फसलं आता खरं पाखरागत उडतंय….. अशा गावरान भाषेत प्रेमाचे बोल ओठावर आणणारे हे गाणे आहे. सध्या रसिक प्रेक्षकांत रोमँटिक गाण्यांची क्रेझ जरा जास्तच आढळून येत आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या प्रेमापोटी हे प्रेमाचे तरल गीत एका म्युझिक व्हिडिओसह प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्याची आकर्षणाची बाजू म्हणजे लागीरं झालं जीफेम शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण म्हणजेच आपले शीतली आणि आज्या यांची जोडी या गाण्यातून रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत.

प्रेम ही भावना मनात तरंग उमटवणारी आहे. आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमातच पडतो आणि त्यानंतर तो हरवून जातो. आपल्यासाठी कुणीतरी असणं आणि त्याच्या प्रेमात वेडेपणाचा कळस गाठणं यातलं सुख प्रेमात पडल्याशिवाय उमगत नाही. अशा हव्याहव्याशा वाटणार्या एका गुलाबी नात्याचे पदर उलगडणारे आणि प्रेमाच्या जगातील भावनांच्या हिंदोळ्यावर सफर घडवणारे एक प्रेमगीत अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता नितीश चव्हाण प्रेक्षकांच्या भेटीस एका आगळ्या वेगळ्या अंदाजात घेऊन येत आहेत. एव्ही प्रॉडक्शनसह मराठी म्युझिक टाऊन या म्युझिक लेबलने ही या गाण्याला प्रस्तुत केले असून या म्युझिक लेबल अंतर्गत असलेले हे पहिलेवहिले गाणं आहे. मंगल पी, अभिजित आणि विश्वजित निर्मित तर दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित या सुमधुर संगीताला दिलेली नफत्याची जोड अगदी प्रसन्न करून सोडणारी आहे. ओंकार याआधी बेखबर कशी तू या म्युझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला, शिवाय चंद्र झुल्यावर, तू ये साथीला याही गाण्यांची दिग्दर्शनाची धुरा ओंकारने साकारली. तसेच निर्माता विश्वजितचे हे मराठी सफष्टीतील दुसरे निर्मित केलेले मराठी गाणे असून याआधी त्याने दिल बुद्धू या हिंदी गाण्यातून सिनेसफष्टीत पदार्पण केले होते. आपल्या दमदार आणि सुमधुर आवाजात गायक विजय भाटे याने हे गाणे गायले आहे तर गाण्याचे बोल राहुल थोरात यांचे असून संगीतकार आशिष आणि विजय यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

Advertisements

Related Stories

जिल्हाधिकाऱयांचा अजब आदेश लोक येत नाही, मग संग्रहालयच हटवा

Amit Kulkarni

आयकर विभागाकडे १.५ कोटी रूपयांची परतफेडीची करणार मागणी ईएसजी उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांची माहिती

GAURESH SATTARKAR

सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

pradnya p

अमृता खानविलकर देतेय योगाचे धडे

Patil_p

रणदीप हुड्डाच्या पत्नीच्या भूमिकेत उर्वशी रौतेला

Amit Kulkarni

शिवानी सुर्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

prashant_c
error: Content is protected !!