तरुण भारत

कोकण रेल्वे स्थानकाचा आकेंच्या बाजूचा फूटब्रिज आजपासून खुला

प्रतिनिधी/ मडगाव

कोरोना महामारीमुळे कोकण रेल्वेने खबरदारीचे उपाय म्हणून रेल्वे स्थानकाची मुख्य गेट तेव्हढीच खुली ठेवली होती. या स्थानकावर जाण्यासाठी आकेंच्या बाजूने फूटब्रिज असून तो प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता. तो आज सोमवारपासून पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मडगावचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिली आहे.

सद्या रेल्वे स्थानकावर येणाऱया सर्व प्रवाशांची नव्या मानक कार्यप्रणाली (एसओपी) प्रमाणे ‘थर्मल गनने’ तपासणी केली जाते. त्यासाठी कोकण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱया सर्व वाटा बंद करण्यात आल्या होत्या व केवळ स्थानकाची मुख्य गेट तेव्हढीच उघडी ठेवण्यात आली होती. आकेंच्या बाजूची वाट बंद करण्यात आली होती. त्यामुळे या बाजूने मोटारसायकल पायलट, रिक्शा चालक तसेच इतर व्यावसायिकांना जबरदस्त फटका बसला होता.

आकेंच्या बाजूने फुटब्रिज खुला करावा अशी मागणी मोटारसायकल पायलट, रिक्शा चालक तसेच इतर व्यावसायिकांकडून केली जात होती. शेवटी हा विषय स्थानिक आमदार दिगंबर कामत यांच्या पर्यंत पोचल्यानंतर त्यांनी शनिवारी दक्षिण गोवा जिल्हधिकाऱयांकडे या संदर्भात चर्चा केली व काल प्रत्यक्ष मामलेदार, कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटके, तसेच पोलीस कर्मचारी यांनी आकेंच्या बाजूने भेट देऊन पहाणी केली. यावेळी आमदार श्री. कामत उपस्थितीत होते. त्यांनी श्री. घाटके यांच्याकडे चर्चा करून आज सोमवारपासून आकेंच्या बाजूने फूटब्रिज खुला केला जाणार असल्याची माहिती दिली.

मडगाव शहरातून कोंकण रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी आकेंच्या बाजूने जाणे प्रवाशांना जवळचे व सोयीस्कर होत असे. मात्र, आकेंच्या बाजूने फूटब्रिज बंद केल्याने प्रवाशांना मोठा वळसा घालून रेल्वे स्थानकाच्या मुख्य गेट पर्यंत जाणे भाग पडत होते. मात्र, आजपासून आकेंच्या बाजूने फूटब्रिज खुला होत असल्याने प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. तसेच गेले काही दिवस व्यवसाय ठप्प झाल्याने त्रास सहन करणाऱया मोटारसायकल पायलट तसेच रिक्शा चालक व इतर व्यावसायिकांना देखील दिलासा मिळणार आहे.

Related Stories

गोवंश हत्या पूर्णपणे बंद करा

Patil_p

विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱयांची रॅली

Patil_p

गोव्यात एकाला ‘कोरोना’ची लागण झाल्याचा संशय

Patil_p

बाबूश पॅनलला पक्षांतर्गत विरोधाचे ग्रहण

Amit Kulkarni

अखेर फोंडय़ातील मासळी बाजार भरला मुख्य मार्केटमध्येच..

Omkar B

राज्यात कोरोनाचा नववा बळी

Patil_p
error: Content is protected !!