तरुण भारत

वेर्णात गांजा प्रकरणी युवकाला अटक, 2 लाखांचा गांजा जप्त

प्रतिनिधी/ वास्को

वेर्णा भागात एका युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 15 हजार रूपये किमतीचा गांजा जप्त केला. सदर युवक वेर्णा औद्योगिक वसाहतीत मजूरांचा पर्यवेक्षक म्हणून काम करीत असून त्याला वेर्णा पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisements

  वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर युवकाचे नाव सिमांचल भास्कर स्वेम(32)असे असून तो मुळ ओरीसा राज्यातील रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी तो गोव्यात आला होता. आयडीसी वेर्णा येथे एका ठिकाणी तो मजूरांवर लक्ष ठेवण्याचे काम करीत होता. हा युवक वेर्णा भागात गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. शनिवारी पोलिसांनी कारवाई करताना त्याला कुंबोर्डा वेर्णा येथे ताब्यात घेतले व त्याच्याकडून 2 किलो 157 ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत 2 लाख 15 हजार 700 रूपये ऐवढी आहे. वेर्णाचे पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण सिमेपुरूषकर, संकेत तळकर, पोलीस शिपाई निलेश कासकर,  अजित नाईक, विदेश नाईक व गिरीष नाईक यांनी ही कारवाई केली.

Related Stories

गोमंतकीय खलाशांना परत आणावे एलिना साल्ढाणा यांची मागणी

Omkar B

…आणि मडगाव नगराध्यक्षा पूजा नाईक यांचा पारा चढला

Patil_p

नगरसेवक प्रक्रियेला बगल देऊन आपली कामे करून घेत असतात

Amit Kulkarni

खाजने-अमेरे-पोरस्कडे पंचायतीतर्फे गोवा मुक्तीदिन साजरा

Amit Kulkarni

दिवगाळी नार्वे येथे गव्याची गोळी झाडून हत्या

Omkar B

‘एसओपी’बाबत सर्वांना विश्वासात घेणार

Omkar B
error: Content is protected !!