तरुण भारत

कोरेगावात मोबाईल चोऱया करणारा अल्पवयीन ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चोरलेले तीन मोबाईल जप्त

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

कोरेगाव येथे विविध ठिकाण घरात घुसून मोबाईल चोरी करणारा अल्पवयीन युवक सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे. त्याने कोरेगावात चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातील 30 हजार रुपये किंमतीचे तीन चोरीचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

सातारा स्थानिक गुन्हे शाखेला सध्या कॅप्टन नसला तरी टीमचे काम तेवढय़ाच ताकदीने सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना बाँबे रेस्टारंट परिसरात मोबाईल चोरीतील विधीसंघर्ष बालक चोरीचे मोबाईल विक्री करण्यास येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या परिसरात सापळा रचला.

तिथे पथकाने चोरीचे मोबाईल विक्री करण्यास आलेल्या विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपुस केली असता सदरचे मोबाईल हे कोरेगाव शहरातील विविध ठिकाणी घरात प्रवेश करुन चोरी केले असल्याचे त्याने सांगितले. पथकाने त्याच्या ताब्यातील सॅमसंग, ओपो, रेडमी कंपनीचे 30 हजार रुपये किंमतीचे 3 मोबाईल जप्त केले आहेत. त्याला पुढील तपासासाठी कोरेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या कारवाईत जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम बर्गे, हवालदार सुधीर बनकर, पोलीस नाईक साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, गणेश कापरे, अमित सपकाळ, कॉन्स्टेबल केतन शिंदे विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, चालक संजय जाधव यांनी सहभाग घेतला होता.

Related Stories

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Abhijeet Shinde

म मॅरेथॉनचा पुस्तक आले भेटीला

Patil_p

सलग तिसऱ्या दिवशी बाधित वाढ 20 च्या खाली

datta jadhav

आमदार शिवेंद्रसिंहराजे बनले कॅरमपट्टू

Patil_p

मुलांना आणण्यासाठी निघालेले दाम्पत्य अपघातात ठार

Patil_p

साताऱ्यात उद्या मोफत महालसीकरण

datta jadhav
error: Content is protected !!