तरुण भारत

अमेरिका : करबचतीसाठी एलन मस्क दुसऱ्या राज्यात मुक्काम हलविणार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकांवर असलेले टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलन मस्क कर बचत करण्यासाठी दुसऱ्या राज्यात मुक्काम हलविण्याचा विचार करत आहेत. एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

Advertisements

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात मस्क राहतात. त्यांची यांची संपत्ती 125 अब्ज डॉलर्स असून, या वर्षात 118 अब्ज डॉलर्सने त्यात वाढ झाली आहे. कॅलिफोर्नियात या राज्यात रहिवाशांना राज्य कर भरावा लागतो. मस्क यांनाही मोठ्या प्रमाणात हा कर द्यावा लागतो. सरकारी करातून सवलत मिळण्यासाठी नागरिक अनेक प्रकारे प्रयत्न करतात. तसेच मस्क देखील प्रयत्न करत आहेत. 

अमेरिकेच्या टेक्सास राज्यात हा कर द्यावा लागत नाही. त्यामुळे मस्क कॅलिफोर्नियातून टेक्सासमध्ये मुक्काम हलविण्याच्या तयारीत आहेत. टेक्सासमध्ये त्यांच्या अब्जावधी डॉलर्सची बचत होणार आहे.

Related Stories

पाकिस्तानातील कोरोनाबाधितांची संख्या 21 हजारांपार

datta jadhav

राफेल : कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीस फ्रान्स तयार; न्यायाधीशांची नियुक्ती

datta jadhav

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार

Patil_p

डॉ. फैसल सुलतान पाकचे नवे आरोग्यमंत्री

datta jadhav

अफगाणिस्तान संघर्षात 34 जणांचा मृत्यू

Omkar B

काबूल विमानतळ स्फोट ; याचा हिशेब चुकता करु : जो बायडेन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!