तरुण भारत

चार गावांत पसरलेल्या वणव्याने लाखोंचे नुकसान

ऐन हंगामात आंबा काजूच्या झाडांचे नुकसान : मालगुंड, चाफे, निवेंडी , कळझोंडी गावांना फटका

प्रतिनिधी / रत्नागिरी

Advertisements

तालुक्यातील मालगुंड निवेंडी, चाफे कळझोंडी या परिसरात लागलेल्या वणव्यामुळे आंबा, काजू फणसाच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आह़े शनिवारी सकाळी ही आग लागली होत़ी दरम्यान या परिसरात सुकलेल्या गवताने पेट घेतल्याने ही आग मोठय़ा प्रमाणावर पसरल्याने मोठे नुकसान झाल़े अखेर स्थानिकांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आल़ी

या आगीमध्ये तब्बल 610 आंब्याची झाडे, 280 काजू कलमे, विद्यूत पंप, वायरी पाईप आदींचे मोठे नुकसान झाले आह़े पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आग सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लागली होत़ी चाफे, निवेंडी-धनगरवाडी, कळझोंडी या परिसरात या आगीचे लोण पसरल़े या आगीचे नेमके कारण समजून आलेले नाह़ी मात्र ऐन हंगाम सुरू होत असतानाच आगीमध्ये झाडांचे मोठे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त बागायतदार चिंतेत पडेले आहेत़

यामध्ये स्थानिक बागायतदार भुपेंद्र महादेव भोजे यांची 150 आंबा कलमे, 100 काजू, पंप, पाईप वायरिंग जळून खाक झाले आह़े तर बाबाजी रामचंद्र कोकरे यांची 89 कलमे व 100 काजू झाडे खाक झालीत़ तर भालचंद्र भिकाजी नलावडे यांची 300 कलमे पाईप वायरिंग आदी जळून खाक झाली आहेत़ अशी माहिती प्राप्त झाली आहेत़

Related Stories

चिपळुणात एनडीआरएफची तुकडी दाखल

Patil_p

रत्नागिरी : अखेर लसीची प्रतीक्षा संपली; जिल्ह्यात १६ हजार ३३० लस उपलब्ध

Abhijeet Shinde

अनारी ग्रामस्थांनी जोपासलेय वृक्ष संवर्धनाची चळवळ!

Patil_p

जिह्यात चाचण्यांसह पुन्हा रुग्णसंख्येत घट

Patil_p

जिल्हय़ात महिना अखेरपर्यंत कोरोना लस उपलब्ध होणार

Patil_p

शिरगाव स्वरुपानंद नगरात विहिरी बनल्या सांडपाण्याने दुषित

Patil_p
error: Content is protected !!