तरुण भारत

रशियाचा रुडिक मकारियन ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

प्रतिनिधी / सांगली

पुरोहित चेस अकॅडमी, सांगली यांच्यातर्फे आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये रशियाचा इंटरनॅशनल मास्टर रुडिक मकारियन हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ७७ गुणांसह विजेतेपद पटकावले. तसेच ५० गुणांसह भारताचा आर्यन वार्षण या स्पर्धेमध्ये वयोगटातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरला. भारतासह तुर्कमेनिस्तान, ईजराईल, सर्बिया, अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन आर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यांसह अनेक देशांतील ग्रँडमास्टर्स, इंटरनॅशनल मास्टर्स, फिडे मास्टर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा आर्मेनियाचा फिडे मास्टर सर्गिस मनुक्यान याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली गेली. यामध्ये मोल्डोव्हाचा फिडे मास्टर लास्किन जिगोर हा ७३ गुणांसह या स्पर्धेचा उपविजेता ठरला. अफगाणिस्तान चा इंटरनॅशनल मास्टर समीर सहिदी यास ७० गुणांसह तृतीय, हंगेरीचा ग्रँडमास्टर इमरे बलोग यास ६८ गुणांसह चौथे, युक्रेनचा ग्रँडमास्टर किरिल शेवचेको यास ६७ गुणांसह पाचवे,

तुर्कमेनिस्तानचा इंटरनॅशनल मास्टर सपरमीरत अताब्येव यास ६७ गुणांसह सहावे, ग्रीसचा अँडमास्टर बानिकस हिस्ट्रोस यास ६५ गुणांसह सातवे, इंडोनेशियाचा कॅण्डीडेट मास्टर बगस अरपान यास ३२ गुणांसह आठवे, आर्मेनियाचा ग्रँडमास्टर जागेन एंड्रियासियन यास ६२ गुणांसह नववे व आर्मेनियाचाच बॅण्डीडेट मास्टर अरत्योम मनुक्यान यास ६२ गुणासह दहावे स्थान प्राप्त झाले. पुरोहित चेस अकॅडमीचे प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. तसेच साको चेस क्लब, येरेवन यांच्या मार्फत ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली. तांत्रिक पंच म्हणून चंद्रशेखर कोरवी, दीपक वायचळ, सारंग विवेक पुरोहित आणि शार्दूल तपासे यांनी काम पाहिले.

Advertisements

Related Stories

सांगली जिल्हा पूरस्थिती Live : अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवून अडीच लाख क्युसेस

Abhijeet Shinde

मिरजेत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

सांगली जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या विरोधात सदस्यांचे आंदोलन

Abhijeet Shinde

कसबे डिग्रज नळ पाणीपुरवठा योजनेस मान्यता

Sumit Tambekar

नागठाणे परिसरात घडतायत भानामतीचे प्रकार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Abhijeet Shinde

मिरजेत रुग्णालयात वॉर्डबॉयकडूनच महिलेचा विनयभंग

Abhijeet Shinde
error: Content is protected !!