तरुण भारत

इराण : उपग्रह नियंत्रित शस्त्राने झाली अणुशास्त्रज्ञ फखरीजादेह यांची हत्या

ऑनलाईन टीम / तेहरान : 

इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची हत्या करण्यासाठी उपग्रहनियंत्रित शस्त्रांचा वापर करण्यात आल्याची भीती आहे. इराणच्या सरकारी टीव्ही नेटवर्कने हा दावा केला आहे. यापूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, फखरीजादेह यांना ठार मारण्यासाठी वापरले जाणारे शस्त्र इस्रायलमध्ये तयार करण्यात आले होते. त्यानंतर 27 नोव्हेंबरला फखरीजादेह यांची हत्या झाली. 

Advertisements

रिअर ॲडमिरल फडावी यांनी म्हटले आहे की, फखरीजादेह 27 नोव्हेंबर रोजी तेहरानबाहेरील महामार्गावरून कारमधून प्रवास करत होते. हत्येवेळी मशीनगन फक्त त्यांच्या चेहऱ्यावर अशा प्रकारे केंद्रित होती की अवघ्या 25 सेंटीमीटर अंतरावर बसलेल्या त्याच्या पत्नीवर गोळी झाडण्यात आली नाही.

घटनास्थळाभोवती एकाही व्यक्तीची उपस्थिती आढळली नसल्याने फखरीजादेह यांना ठार मारण्यासाठी स्वयंचलित शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे इराणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इराणचे अध्यक्ष हसन रुहानी आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी या हत्याकांडाचा  बदला घेणार असल्याचे म्हटले आहे. 

Related Stories

डोंगराळ भागातील लढाईसाठी भारताकडे सर्वात मोठी आणि अनुभवी सेना; चिनी लष्करी तज्ज्ञांचा दावा

pradnya p

कांगोमध्ये घरांमध्ये शिरला लाव्हारस

Patil_p

पेटत होते रुग्णालय, शस्त्रक्रिया करत राहिले देवदूत

Patil_p

UAE मध्ये कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

datta jadhav

लस लवकरच : बायडेन

Patil_p

शाळांमध्ये स्कर्ट घालून येत आहेत शिक्षक

Amit Kulkarni
error: Content is protected !!