तरुण भारत

जगातील पवित्र धार्मिक स्थान म्हणून केदारनाथची ओळख

केदारनाथ मंदिराच्या पुजाऱयांची कपिलेश्वर मंदिरला भेट

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

केदारनाथ येथील मंदिराचे पुजारी राजशेखर लिंग यांनी सोमवारी दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला भेट दिली. मूळचे बेळगावचे मुत्नाळ गावचे असणारे राजशेखर हे मागील 35 वर्षांपासून केदारनाथ येथील मंदिरात पुजारी म्हणून काम करीत आहेत. तीन वर्षांनी ते सोमवारी बेळगावला आले असता त्यांनी कपिलेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना केदारनाथ येथे येण्याचे आमंत्रण दिले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक वेगळेच आध्यात्मिक सुख मिळाले. बेळगावला वरचेवर येणे-जाणे असते. परंतु आज कपिलेश्वर मंदिराला भेट देण्याचा योग आला. जगातील एक पवित्र धार्मिक स्थान म्हणून केदारनाथची ओळख आहे. दरवषी हजारो भाविक दर्शनासाठी केदारनाथला येतात. नैसर्गिक देणगी लाभलेल्या केदारनाथमध्ये भगवान शिवशंकर वास करतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.

केदारनाथ प्रलय न विसरण्यासारखा

केदारनाथ येथे काही वर्षांपूर्वी महाप्रलय आला होता. संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त झाले. परंतु केदारनाथाच्याच चमत्कारामुळे एक महाकाय दगडामुळे मंदिराचा ढाचा सुरक्षित राहिला. त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी होतो. हा अनुभव न विसरण्यासारखा असला तरी केदारनाथच्या आशीर्वादामुळेच आम्ही वाचल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंदिर ट्रस्टच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, सतीश निलजकर, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, राकेश कलघटगी, संदीप भातकांडे, विवेक कोसंदल, दौलत जाधव यांसह भाविक उपस्थित होते.

Related Stories

शाहूनगर गटारीतील माती काढली

Patil_p

स्वामी विवेकानंद सोसायटीने सभासदांच्या विश्वासावर साधली प्रगती

Amit Kulkarni

अधिकाऱयांकडून घडले माणुसकीचे दर्शन

Patil_p

एपीएमसी बाजारात रताळी मागणीत वाढ

Omkar B

विश्रुत स्ट्रायकर, झेवियर गॅलरी संघ विजयी

Amit Kulkarni

तालुक्याच्या पूर्वभागात ऊस बांधणी कामाला वेग

Amit Kulkarni
error: Content is protected !!