तरुण भारत

देशातील रुग्णसंख्या 97 लाखांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 26 हजार 567 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 385 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 97 लाख 03 हजार 770 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 40 हजार 958 एवढी आहे.

Advertisements

सोमवारी दिवसभरात 39,045 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 3 लाख 83 हजार 866 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 91 लाख 78 हजार 946 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 14 कोटी 88 लाख 14 हजार 055 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 26 हजार 399 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.7) करण्यात आल्या. 

Related Stories

आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार योजनेचा प्रारंभ

Patil_p

थकीत एफआरपी संदर्भात राज्यांना नोटीस

Abhijeet Shinde

Budget 2021 : रेल्वे सेवा सुविधेच्या विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद

Abhijeet Shinde

जीवन विमा करविणेच उत्तम!

Patil_p

मेहबूबा मुफ्तींचे चिथावणीखोर वक्तव्य

Patil_p

10 महिन्यांनी रेल्वेंमध्ये भोजन मिळणार

Patil_p
error: Content is protected !!