तरुण भारत

सोल शहर : कोविड-19 युद्धक्षेत्र

दक्षिण कोरियात कोरोना संक्रमण वेगाने फैलावण्यादरम्यान आरोग्यमंत्र्यांनी सोल शहर आता ‘कोविड-19 युद्धक्षेत्र’ असल्याचे विधान सोमवारी काढले आहेत. दक्षिण कोरियात दिवसभरात 615 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील 10 दिवसांमध्ये देशात 5,300 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचे बहुतांश बाधित सोल शहरी क्षेत्रात सापडले आहेत. शहरातील रेस्टॉरंट, शाळा, रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांसमवेत विविध ठिकाणी संक्रमण फैलावण्यापासून रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी संघर्ष करत आहेत.

राजधानी क्षेत्र आता कोविड-19 चे युद्धक्षेत्र ठरले आहे. देशाला संक्रमण फैलावण्यापासून रोखण्यासाठी सामाजिक अंतर वाढवावे लागू शकते असे दक्षिण कोरियाचे आरोग्यमंत्री पार्क नेयुअंग हू यांनी म्हटले आहे. सोल या लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या शहरात संक्रमण रोखण्याचे काम सोपे ठरणार नाही.

Advertisements

देशाचे अध्यक्ष मून जेई इन यांचे सरकार विषाणूच्या विरोधात प्रथम मिळालेल्या यशाचा प्रचार करण्यास आतूर असतानाच सामाजिक अंतराचे निर्बंध शिथिल करण्यास घाई केल्याने आता टीका होऊ लागली आहे.

चाचण्यांवर भर

वाढते रुग्ण पाहता दक्षिण कोरियाने कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती मून-जेई-इन यांनी यासंबंधी सोमवारी घोषणा केली आहे. या कामात सैन्य मदत करणार आहे. याचबरोबर चाचण्यांकरता सरकारी कर्मचाऱयांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे मून यांनी सांगितले आहे.

Related Stories

कोरोनामुळे 43 देशांनी ब्रिटनशी संपर्क तोडला

datta jadhav

प्रथम काश्मीर बळकावू, नंतर भारतात घुसू

Omkar B

अर्थसंकल्पापूर्वी मोदींची 13 वी बैठक

Patil_p

सौदी बनणार झिरो कार्बन उत्सर्जन करणारा देश

datta jadhav

बाली बेटांजवळ पाणबुडी बुडाली; 53 सैनिकांना वीरमरण

datta jadhav

यंदा खरेदीविनाच ख्रिसमस…

Omkar B
error: Content is protected !!