तरुण भारत

पेट्रोल-डिझेल दराचा भडका

सलग सहाव्या दिवशी दरवाढ : मुंबईत पेट्रोल नव्वदीपार, डिझेल दर 80 रुपयांवर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी सलग सहाव्या दिवशी वाढ झाली आहे. सोमवारी इंधन दरात प्रतिलिटरमागे 23 ते 30 पैशांनी वाढ झाली आहे. नव्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर 90.05 रुपयांवरून प्रतिलिटर 90.34 रुपये झाले, तर डिझेलचे दर 80.23 रुपयांवरून 80.51 रुपयांवर पोहोचले आहे.

तेल विपणन कंपन्यांच्या किंमतीच्या सूचनेनुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 30 पैशांनी आणि डिझेलमध्ये 26 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून तेल कंपन्यांनी सातत्याने दरवाढ सुरू केल्यामुळे सप्टेंबर 2018 नंतर प्रथमच दर आता सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. गेल्या 18 दिवसात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.65 रुपये तर डिझेलच्या दरात 3.41 रुपये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 83.41 रुपयांवरुन 83.71 रुपयांपर्यंत वाढले आहेत, तर डिझेलचे दर 73.61 रुपयांवरून 73.87 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. स्थानिक विक्री कर किंवा व्हॅटच्या दरानुसार प्रत्येक राज्यात वेगवेगळे दर आकारले जात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतातही तेल कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे.

Related Stories

राजस्थान : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

Rohan_P

केंद्र सरकारकडून सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

Rohan_P

पाण्याऐवजी निघू लागले तेल

Patil_p

ईपीएफ चा व्याजदर 8.50 टक्क्यांवर जैसे थे

Rohan_P

सनी लियोनीला उच्च न्यायालयाचा दिलासा

Patil_p

झऱयाच्या पाण्यादरम्यान पेटणारी ज्योत

Patil_p
error: Content is protected !!