तरुण भारत

‘अमुल’ची क्रमवारीत आठव्या स्थानी झेप

आयएफसीएनच्या जागतिक यादीत कामगिरी : उत्पादनांना मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

दूध-दही चॉकलेटपासून आईस्क्रीम यासारख्या डेअरी उत्पादनात वरचढ होऊ पाहणाऱया अमुल कंपनीच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. जागतिक स्तरावरील आयएफसीएनच्या ताज्या यादीमध्ये ‘अमुल’ने टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. ताज्या प्रसिद्ध झालेल्या यादीत कंपनीने आठवे स्थान प्राप्त केले आहे.

गुजरात सहकारी दूध संघाअंतर्गत अमुल ब्रँड विकसित झाला आहे. अलीकडच्या काळात अमुलच्या सर्वच उत्पादनांना भारतीयांनी चांगली पसंती दर्शवली आहे. या लोकप्रियतेच्या जोरावर कंपनीने आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. 2012 मध्ये या यादीमध्ये अमुल कंपनी 18 व्या स्थानी तर 2018 मध्ये 9 व्या स्थानी होती. पण या खेपेस मात्र कंपनीने आठवे स्थान पटकावले आहे. ही बाब कंपनीसाठी अभिमानाची आणि समाधानाची राहिली आहे. कंपनीने नुकतीच व्यवसायाची 75 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. 1945-46 मध्ये कंपनीची सुरुवात झाली होती.

दररोज 33 लाख लिटर दूधाचे उत्पादन

दुध उत्पादनाचा विचार करता कंपनी सध्या दररोज 33 लाख लिटर दुधाचे उत्पादन घेते. सुरुवातीला अगदी प्रारंभी 250 लिटर प्रति दिवशी दुधाचे उत्पादन घेतले जात होते. संपूर्ण जगाच्या दूध उत्पादनाचा विचार करता कंपनीचा वाटा 1.2 टक्के इतका आहे.

Related Stories

पुढील वर्षी जूनपर्यंत 50 ते 60 लाख जणांना रोजगार

Patil_p

चीनला आणखी एक धक्का; हिरो सायकलने रद्द केला 900 कोटींचा करार

datta jadhav

बेजोस लवकरच सीईओ पद सोडण्याचे संकेत

Patil_p

शाओमी स्मार्ट टीव्ही, फोन निर्मिती क्षमता वाढवणार

Patil_p

हिरे व्यापाऱयांनी केली कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ

Patil_p

टाटा समूहाकडून 500 कोटींचा मदतनिधी

tarunbharat
error: Content is protected !!