तरुण भारत

गुडे पाठोपाठ ओशेलात पाण्याची टंचाई

वार्ताहर/ शिवोली

गुडे शिवोली येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटता न सुटता आता ओशेल भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. ओशेल पंचायतीच्या प्रभाग क्र. 6 व 7 मध्ये गेले पंधरा दिवस पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे येथील नागरिकांचे पाण्याविना हाल झाले आहे. दोन्ही प्रभागातील नागरिकांनी येथील श्री देव ब्राह्मण कालिका देवस्थानच्या प्रांगणात एकत्रित येऊन सार्वजनिक बांधकामच्या पाणी विभागावर आपला रोष व्यक्त केला.

Advertisements

 पंचसदस्य प्रविण कोचरेकर यांनी सांगितले की, ओशेल पंचायत क्षेत्रातील दोन्ही प्रभागात पाण्याची टंचाई होत नव्हती. अधूनमधून नळ कोरडे पडले तर. पण तस कधी झालं असं आम्हाला आठवत नाही. अभियंत्यांशी आपण संपर्क साधून दोन्ही प्रभागात होणाऱया अपुऱया पाणी पुरवठाबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सगळय़ांना पाण्याचा पुरवठा होणार याची आम्ही देखल घेऊन पुरवठा केला जात आहे.  पाणी सोडणारे ऑपरेटर्स गफलत करुन पाणी दुसऱया मार्गे वळविण्याचा प्रयत्न करतात याची शक्यता नाकारता येत नाही. गेले पंधरा दिवस दोन्ही प्रभागातील नागरिक पाण्यासाठी हैराण झाले आहे. ज्येष्ठ नागरिक प्रेमावती कोचरेकर यांनी सांगितले की, पूर्वी स. 8 वाजेपर्यंत नळाला पाणी येत असे. आता रात्रीच्या 3 वा. उठून नळाला पाणी येणार म्हणून जागरण करावे लागते पण उतरत्या वयात ते शक्य होत नाही. सरकारने आमच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा.

खराब वॉल्व बदलत नाही

सेंट ऍन्थनी चर्चसमोरील व्हॉल्व खराब झाले आहेत. त्यातून सतत पाणी बाहेर फेकले जाते. तात्पुरता उपाय म्हणून त्याला साडी गुंडाळलेली आहे व हा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर ‘व्हायरल’ होत आहे. यावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते असे आग्नेल फर्नांडीस यांनी सांगितले.

Related Stories

मोबाईल चोरटय़ाला अटक

Amit Kulkarni

ईलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी राज्यात लवकरच खास योजना

Amit Kulkarni

भाजपची आज राज्य कार्यकारिणी बैठक

Amit Kulkarni

दोन्ही टोळीतील गुंडांची धरपकड सुरू

Omkar B

भिमराव आंबेडकर स्पोर्ट्स क्लबतर्फे स्व.जितेंद्र देशप्रभू याना श्रद्धांजली

Amit Kulkarni

एनजीओ, डायलेसीस रुग्णांना मदतनिधी

Omkar B
error: Content is protected !!