तरुण भारत

मेक्सिकोत कोरोनाबळींच्या संख्येने गाठला 1.10 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी : 

मेक्सिकोत कोरोनाबळींच्या संख्येने 1.10 लाखांचा टप्पा गाठला आहे. या देशात आतापर्यंत 11 लाख 82 हजार 249 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 10 हजार 394 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

मेक्सिकोत सोमवारी 7455 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 261 जणांचा मृत्यू झाला. 11.82 लाख रुग्णांपैकी 8 लाख 73 हजार 555 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 98 हजार 620 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 3279 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिक जगात बाराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 30 लाख 23 हजार 227 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Related Stories

70 टक्के लोकांनी मास्क वापरल्यास महामारी नियंत्रित

Omkar B

धावपटू उसेन बोल्ट याला कोरोनाची बाधा 

pradnya p

कोटय़धीश असूनही भिक्षाधीश

Patil_p

कोरोनाचा विस्फोट : ‘या’ देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा

pradnya p

युरोपीय महासंघाकडून 41 लाख कोटीची मदत

Patil_p

रशिया-अमेरिका संबंध संपुष्टात?

Patil_p
error: Content is protected !!