तरुण भारत

दिल्ली : शेतकरी थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली होती. आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेच्या पाच फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. शेतकरी मात्र तिन्ही कृषी सुधारणा कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी सायंकाळी 7 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. 

Advertisements

इंडियन फार्मर्स युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले, आज सायंकाळी सात वाजता आम्ही गृहमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहोत. सिंघू सीमेवर जाऊन तिथून आम्ही गृहमंत्र्यांकडे जाऊ. शाह शेतकऱ्यांच्या 13 सदस्यांच्या टीमची भेट घेणार आहेत. 

Related Stories

उत्तराखंड : गेल्या 24 तासात 429 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

भारताच्या व्हिसांची पाकिस्तानकडून चोरी

Patil_p

भारतात मागील 24 तासात 26,506 नवे कोरोना रुग्ण, 475 मृत्यू

datta jadhav

हरियाणाचे आरोग्यमंत्री लस घेऊनही कोरोनाबाधित

Patil_p

राज्यात पुन्हा 12 नवे रुग्ण

Patil_p

आंध्रप्रदेशात मारले गेले 6 नक्षलवादी

Patil_p
error: Content is protected !!