तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण कार्यक्रम जाहीर

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हयातील सरपंच पदासाठी आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. 2020 ते 2025 साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणाऱया स्त्रिया व सर्वसधारण स्त्राr सरपंच पदासाठी मंगळवार दि. 15 डिसेंबर 2020 रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

तालुक्यांमध्ये सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचे केंद्र

तहसिलदार यांनी यापूर्वीच्या निवडणुकांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीचा विचार करून सरपंच पदे प्रवर्गनिहाय आळीपाळीने नेमून द्यावीत. अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत. तसेच शाहूवाडी- पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालय, शाहूवाडी, पन्हाळा- पन्हाळा नगरपरिषद हॉल, मयुर बाग, एसटी स्टँण्डच्या मागे पन्हाळा, हातकणंगले- नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय हातकणंगले, शिरोळ- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय शिरोळ, करवीर- बहुद्देशीय हॉल, रमनमळा कसबा बावडा, कोल्हापूर, गगनबावडा- तहसिल कार्यालय गगनबावडा, नवीन प्रशासकीय इमारत, राधानगरी- राजर्षी शाहू सभागृह, तहसिल कार्यालय राधानगरी, कागल- बहुद्देशीय सभागृह, तहसिलदार कार्यालयजवळ, कागल, भुदरगड- पंचायत समिती भुदरगड येथील दिनकरराव जाधव सभागृह (गारगोटी) दुसरा मजला, आजरा- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय आजरा, गडहिंग्लज- शाहू सभागृह, नगरपरिषद गडहिंग्लज, चंदगड- मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय चंदगड आदी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीच्या केंद्रांचा समावेश आहे.

सकाळी 11 वाजता सोडतीची वेळ निश्चित

तालुकानिहाय निश्चित केलेल्या (बिगर अनुसूचित क्षेत्र) मधील ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने वरील नमूद ठिकाणी काढणेकामी तसेच स्त्राr आरक्षण निश्चित करण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांना जिल्हाधिकाऱयांनी आरक्षण सोडत काढण्यासाठी मंगळवार दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली असल्याची सूचना केली आहे.

सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत जाहीर सूचना

ग्रामपंचायतीतील सरपंच पदाच्या आरक्षण बाबतची जाहीर सूचना तालुक्यातील सर्व गावी जाहिर दवंडीने देऊन तसेच ग्रामपंचायतीच्या फलकावर किमान 3 दिवस जनतेच्या माहितीसाठी राहील याची दक्षता घ्यावी. तसेच याबाबत स्थानिक वृत्तपत्रात सोडतीबाबत आगाऊ प्रसिध्दी व्यापक पध्दतीने देण्यात यावी त्यासाठी तालुक्यांतील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्य तसेच आपल्या तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांना देखील सोडतीचे वेळी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रीत करण्यात यावे. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केल्या आहेत.

आरक्षित प्रवर्ग व सरपंच पदाची संख्या

1) अनुसूचित जाती (महिलांसह) – 138 (त्यापैकी 69 महिलांकरिता), 2) अनुसूचित जमाती (महिलांसह) – 8 (त्यापैकी 4 महिलांकरिता), 3) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिलांसह) – 277 (त्यापैकी 139 महिलांकरिता), 4) सर्वसाधारण (महिलांसह) – 602 (त्यापैकी 301 महिलांकरिता).

12 तालुक्यात 1 हजार 25 ग्रामपंचायती
सरपंच पदाच्या आरक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील 12 तालुक्यातील 1 हजार 25 ग्रामपंचायातींच्या 2020 ते 2015 या काळासाठी सरपंच आरक्षण पदाच्या सोडती होणार आहेत. ज्या-त्या तालुक्यातील विविध केंद्रांच्या ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित होणार आहे.

Advertisements

Related Stories

सातवा वेतन आयोग देण्यास महापालिका असमर्थ; प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची माहिती

Abhijeet Shinde

जागते रहो…

Abhijeet Shinde

कोल्हापूर : नेसरीचा सीमोल्लंघन सोहळा रद्द

Abhijeet Shinde

राधानगरीच्या संकेतची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना सक्रीय रुग्णसंख्या 48 वर; प्रादूर्भाव झाला कमी

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात सहा महिन्यांनंतर कोरोना मृत्यू शुन्यावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!