तरुण भारत

बेळगावमध्ये फोरेन्सिक लॅब निर्माण होणार

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील प्रादेशिक केंद्रे असणाऱया बेळगावसह गुलबर्गा, म्हैसूर, मंगळूर आणि धारवाड या पाच ठिकाणी फोरेन्सिक लॅब (एफएसएल प्रयोगशाळा) सुरू करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. मंगळवारी प्रश्नोत्तर चर्चेवेळी काँग्रेसचे आमदार ईश्वर खंड्रे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले.

Advertisements

फोरेन्सिक अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने अमली पदार्थ प्रकरणासह विविध प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे प्रादेशिक केंद्रांमध्ये फोरेन्सिक लॅब सुरू करण्यात येतील. तर जिल्हा केंद्रांमध्ये बेसिक लॅब सुरू करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.

बेंगळूरमध्ये अलिकडेच फोरेन्सिक लॅब सुरू  करण्यात आले आहे. त्यातही नार्कोटीक म्हणजेच अमली पदार्थ प्रकरणासंबंधी तपास करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

सीसीडी संस्थापकांच्या पत्नीविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

Shankar_P

मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना

Omkar B

महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांनाही निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करा

triratna

केएसआरटीसीची तामिळनाडूसाठी बस सेवा सुरू

Shankar_P

विधानपरिषदेत भाजप-निजदमध्ये हातमिळवणी?

Omkar B

बेंगळूरला लसीचे ३ लाख डोस मिळणार

Shankar_P
error: Content is protected !!