तरुण भारत

ता.पं.मध्ये आज अबकारी व पोलीस अधिकाऱयांची बैठक

प्रतिनिधी/ बेळगाव

निवडणूका जाहीर झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी अधिकारीवर्ग आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. बेळगाव तालुक्मयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तातडीने तालुका पंचायतमध्ये बैठक बोलविण्यात येणार आहे. याबाबत बुधवारी अबकारी विभाग, पोलीस खाते आणि तालुका पंचायतमधील अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Advertisements

सकाळी ही बैठक होणार आहे. बेळगाव तालुक्मयातील आचारसंहितेचे मुख्य अधिकारी व तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी हे ही बैठक घेणार आहेत. या बैठकीत तालुक्मयातील आचारसंहिता भंग होवू नये यावर कोणकोणते उपाय योजना राबविण्यात याव्यात तसेच अबकारी खाते व पोलीस प्रशासनाने हे गैरप्रकारांवर काळा घालण्यासाठी कोणत्या उपया योजना राबविणार याची माहिती घेण्यात येणार आहे.

बेळगाव तालुक्मयात आता 57 ग्राम पंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. सध्या अर्ज भरण्यासाठी मोटय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. शुक्रवार दि. 11 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर प्रचाराला गती देण्यात येणार असून आचारसंहिता भंग होवू नये यासाठी प्रयत्न करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणावी, याचीही चर्चा बैठकीत होणार आहे.

Related Stories

माळमारूती येथील गाळय़ांसाठी चढाओढ

Patil_p

चार्टर्ड अकौंटंट्स बेळगाव शाखेला बहुमान

Amit Kulkarni

निपाणी बसस्थानक परिसरातील 5 दुकाने फोडली

Omkar B

कुडचीतील 20 स्वॅब अहवाल प्रतीक्षेत

Patil_p

टँकरची स्कुटीला धडक; बाप-मुलगी ठार

Patil_p

चिकोडी उपविभागातील बंधारे खुले

Patil_p
error: Content is protected !!