तरुण भारत

मंगळवारी ग्राम पंचायतीसाठी 244 अर्ज दाखल

दोन दिवसांत 306 जणांचे अर्ज दाखल

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

ग्राम पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 62 अर्ज दाखल झाल्यानंतर मंगळवारी तब्बल 244 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. एकूण 259 ग्राम पंचायतीची पहिल्या टप्प्यात होत आहे. या ग्राम पंचायतीसाठी 4 हजार 259 सदस्य आहेत. दुसऱया दिवशी मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यास आणखी 3 दिवस शिल्लक असल्याने येत्या काही दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत.

ग्राम पंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागामध्ये मोठय़ा प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. ग्राम पंचायतीला थेट निधी येत असल्यामुळे विकास करण्यासाठी मोठी संधी असल्याचे समजून अनेक जण ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक झाले आहेत. एका व्यक्तीला चार ठिकाणांहून निवडणूक लढविण्याची मुभा आहे. त्यामुळे अनेकांनी दोन ते तीन अर्ज देखील दाखल केले आहेत.

बेळगाव जिह्यात सर्वात जास्त अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी 101 अर्ज दाखल झाले असून त्या खालोखाल हुक्केरी तालुक्मयामध्ये अर्ज दाखल झाले आहेत. हुक्केरी तालुक्मयात एकूण 78 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये एकूण 306 अर्ज दाखल झाले आहेत. ग्राम पंचायतमध्येच हे अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यामुळे शहराकडे व तालुक्मयाकडे येणारा लोंढा गावातच थांबत आहे. त्यामुळे पोलीस व इतर अधिकाऱयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ग्राम पंचायतमध्ये हे अर्ज स्वीकारले जात आहेत. त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी व इतर अधिकारी अर्ज घेत आहेत. एकूणच आता जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा या निवडणुकीला रंग चढत आहे.

Related Stories

स्मार्टसिटी अधिकाऱ्याच्या घरात 23 लाख रुपये सापडले

Rohan_P

रविवारी हजाराहून अधिक अहवाल निगेटिव्ह

Patil_p

एनसीसी दिनानिमित्त रक्तदान शिबिर

Patil_p

होनकुप्पी, हत्तरवाट येथे स्फोटके जप्त

Amit Kulkarni

दैवज्ञ सहकार बँकेवर सहकार पॅनेलची सत्ता कायम

Patil_p

केंद्र आणि राज्य सरकारकडून आलेला निधी जातो कुठे?

Patil_p
error: Content is protected !!