तरुण भारत

शहरातील 12 हजार घरांमध्ये गॅसपुरवठा

मध्यवर्ती भागात गॅसलाईन घालण्यास अडथळा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरात पाईपव्दारा गॅस पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र गॅस जोडणी करून देण्यास स्मार्टसिटीच्या कॉक्रीटीकरणाचा अडथळा होत आहे. त्यामुळेच आतापर्यत शहरातील सव्वाकोटी मालमत्ताधारकांपैकी केवळ 12200 घरामध्ये पाईपलाईनव्दारा गॅस जोडणी करून देण्यात आली असल्याची माहिती मेघा गॅस इंजिनियअरींग कंपनीच्या प्रतिनिधीकडून उपलब्ध झाली आहे.

पाईपव्दारा गॅस पुरवठा करण्याचा प्रस्ताव मार्गी लागला असून घरोघरी गॅसपुरवठा  करण्यासाठी शहरात पाईपचे जाळे घालण्यात आले आहे. सध्या शहरातील  22 हजार नागरिकांनी गॅसजोडणीकरिता नोंदणी केली असून पंधरा हजार घरांना मीटर बसविण्यात आले आहे. तसेच 12हजार 200 घरांमध्ये पाईपव्दारा सुरळीत गॅस पुरवठा करण्यात येत आहे. हैद्राबाद येथील मेघा गॅस एंटरप्रायजेस या कंपनीला शहरात गॅसवाहिनी घालण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. शहर आणि उपनगरात गॅस वाहिन्याचे जाळे घालून घरोघरी गॅसजोडणी करण्याची अट घालण्यात आले आहे. त्यामुळे शहरात गॅस वाहिन्या घालण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र आतापर्यत उपनगरामध्ये गॅस जोडण्या करून गॅस पुरवठा करण्यात येत आहे.

शहरात गॅसपुरवठा करण्यात काही तांत्रिक अडचणीबरोबर स्मार्टसिटी योजनेतील कामांचा अडथळा निर्माण झाला असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधीनी दिली. स्मार्टसिटीच्या कामामुळे तसेच रस्ता खोदाई परवानगीच्या मुद्यावर सदर काम रखडले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात पाईपलाईनव्दारा गॅस पुरवठा करण्याची मागणी होत आहे. पण अंतर्गत रस्ते अरूंद असल्याने रस्त्यावर खोदाई करून गॅस लाईन घालणे अडचणीचे आहे. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत शास्त्राr नगर परिसरातील रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात आले आहेत. याठिकाणी गॅस लाईन घालण्याचे काम करण्यात येणार होते. पण सध्या साहित्याचा तुटवडा भासत असल्याने गॅसलाईन घालण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे शास्त्राr नगर परिसरात गॅस लाईन घालण्याचे काम सध्या रद्द करण्यात आले आहे. परिणामी शास्त्राr नगरवासियांना गॅसलाईनव्दारा गॅस पुरवठा करता येणार नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अरूंद रस्ते, स्मार्टसिटी योजनेअंतर्गत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात आल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात गॅस वाहिन्याचे जाळे घालण्यात अडथळा निर्माण झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पाईपव्दारा गॅस पुरवठा जोडणीकरिता शहरातील 22 हजार नागरिकांनी नोंदणी केली असून यापैकी 15570 घरांमध्ये गॅस रेग्युलेटर, व्हॉल्व आणि मीटर बसविण्यात आले आहेत. गॅस जोडणीकरिता आवश्यक असलेली कामे पुर्ण करण्यात आली आहेत. यापैकी 12हजार 200 ग्राहकांना गॅस वाहिन्याव्दारे गॅस पुरवठा करण्यात येत आहे. गॅस जोडणी करिता पाचशे रूपये नोंदणी शुल्क आणि साडेचार हजार रूपये अनामत रक्कम भरून घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षापासून पाईपलाईन घालण्याचे काम करण्यात येत आहे. सध्या  महातेंश नगर, श्रीनगर, अंजनेय नगर, रामतीर्थ नगर, शाहु नगर, खानापूर रोड, कणबर्गी रोड, कॉग्रेस रोड, कुमारस्वामी लेआऊट, हनुमान नगर, कुवेंपु नगर, सदाशिवनगर, आझम नगर, शिवाजी नगर, आदर्श नगर,  कॅन्टोन्मेट परिसर आणि बसवणकोळळ मार्गावर गॅसवाहिन्या घालण्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे. या भागात गॅसपुरवठा करण्यात येत आहे. गणेशपुर परिसरासह हनुमान नगर परिसरात गॅस जोडणी देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

Related Stories

मुंबईहून येणाऱ्या लोकांवर कर्नाटक सरकारचे विशेष कोविड पाळत ठेवण्याचे आदेश

Sumit Tambekar

तिहेरी खुनाने दोडवाड हादरला

Patil_p

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिकाऱयांची बैठक

Amit Kulkarni

मराठा बँकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Omkar B

शिवप्रतिष्ठानतर्फे शिवाजी उद्यानात दीपोत्सव

Amit Kulkarni

मलप्रभा नदीवरील पूल बनला अपघाताचे ठिकाण

Amit Kulkarni
error: Content is protected !!