तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या भागात अजूनही चकमक सुरू आहे.

Advertisements

 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील पुलवामामधील टिकेन भागात ही चकमक झाली. या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी हा भागाला सर्व बाजूंनी वेढा दिला आणि शोध मोहीम सुरू केली.


जवानांची चाहूल लागतच परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला होता. याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन  दहशतवाद्यांना ठार केले. या भागात अजूनही दहशतवादी लपले आहेत का? याचा शोध जम्मू काश्मीर पोलीस आणि बीएसफचे जवान घेत आहेत. 

Related Stories

जंगलात होणारे रोडकिलिंग थांबवा

Patil_p

महाराष्ट्रात 2 लाख 6 हजार 619 रुग्ण कोरोनाबाधित

Rohan_P

गांधी कुटुंबाच्या 3 विश्वस्त संस्थांची चौकशी होणार

Patil_p

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच घातला मास्क

datta jadhav

देशातील कोरोना रूग्णसंख्या 19 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!