तरुण भारत

उत्तराखंड : कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 79 हजारांचा टप्पा

ऑनलाईन टीम / देहरादून : 


उत्तराखंडात कोरोनाग्रस्तांनी 79 हजारांचा टप्पा पार केला. मागील 24 तासात प्रदेशात 632 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 79 हजार 141 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, काल 15,501 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 632 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 22, बागेश्र्वर 14, चमोली 17, चंपावत 11, देहरादून 279, हरिद्वार 54, नैनिताल 92 पौरी गरवाल 15, पिथोरगड 44, रुद्र प्रयाग 09, तेहरी गरवाल 30, यू एस नगरमधील 27 आणि उत्तर काशीमधील 18 जणांचा समावेश आहे. 

  • 13 हजारपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू 


दिलासादायक बाब म्हणजे काल 436 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशात 71,541 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.40 टक्के इतके आहे. तर सध्या 5 हजार 399 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 1307 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा

Patil_p

कर्नाटकात 515 नव्या कोरोनाबाधितांची भर

Patil_p

दिलासा : दिल्लीत दिवसभरात 20 हजारपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज!

Rohan_P

माउंट एव्हरेस्टच्या उंचीबद्दल नेपाळचा नवीन दावा

datta jadhav

गांधींच्या पुतळय़ाच्या अनावरणप्रसंगी गोंधळ

Patil_p

साखर निर्यातीसाठी डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Patil_p
error: Content is protected !!