तरुण भारत

जगातील सामर्थ्यवान महिलांमध्ये एंजेला मार्केल प्रथम स्थानी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 41 व्या क्रमांकावर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

Advertisements

फॉर्ब्सने जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 41 व्या क्रमांकावर आहेत. 

फॉर्ब्सने 17 व्या वार्षिक ‘फोर्ब्स पॉवर लिस्ट’मध्ये 30 देशांतील महिलांचा समावेश केला आहे. त्यामध्ये 10 देशांतील प्रमुख महिला, 38 मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाच मनोरंजन क्षेत्राशी संबंधित महिला आहेत. 

जर्मनीला आर्थिक संकटातून बाहेर काढून यशस्वी कामगिरी केल्यामुळे जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल पहिल्या स्थानी, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी देशाला कोरोना महामारीतुन बाहेर काढल्यामुळे त्यांना या यादीत दुसरे स्थान देण्यात आले आहे. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना 55 वे तर किरण मजूमदार शॉ यांना या यादीत 68 वे स्थान देण्यात आले आहे.

Related Stories

जम्मू काश्मीर : गंदरबलमध्ये अतिवृष्टी, ढगफुटीने उडाला हाहाकार

Abhijeet Shinde

बोलली जाणारी प्रत्येक भाषा ‘ईश्वरीय’

Patil_p

दिल्ली-जयपूर महामार्गावर बसला आग; तिघांचा मृत्यू

datta jadhav

पाकिस्तानात 7 लाखाहून अधिक कोरोना लसी वाया

Patil_p

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, पुढील 4 दिवस अतिवृष्टीचे; हवामान खात्याचा इशारा

Rohan_P

ब्रिटनच्या संसदेमध्ये चीनी एजंटचा प्रवेश, प्रशासन झाले सतर्क

Patil_p
error: Content is protected !!