तरुण भारत

केरळ सरकारकडून साप पकडण्याचे प्रशिक्षण

विनापरवाना साप पकडणाऱयांना 7 वर्षांची शिक्षा : वन कर्मचाऱयांसह नागरिकांनाही प्रशिक्षण

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

Advertisements

केरळमध्ये आता सपा पडकण्यासाठी परवाना प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केरळच्या वन आणि वन्यजीव विभागाकडून प्रशिक्षण आणि परवाना प्राप्त केल्याशिवाय साप पकडल्यास 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

वन विभागाने साप पकडणाऱयाचा मृत्यू आणि कोब्राचा वापर करून महिलेची हत्या तसेच एका शाळेत सर्पदंशामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या कर्मचाऱयांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. दुसऱया टप्प्यात साप पकडण्यात स्वारस्य असणाऱया लोकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 538 जण या प्रशिक्षणात सामील झाले, ज्यातील 318 जणांना परवाना देण्यात आला आहे. दुसऱया टप्प्यात 620 जण प्रशिक्षणात सहभागी झाले आणि 502 जणांना परवाना मिळाला आहे.

परवाना प्राप्त केलेल्यांमध्ये 35 महिलांचा समावेश आहे. यात 23 वन विभागाच्या कर्मचारी तर 12 जणी सर्वसामान्य नागरिक आहेत. राज्यभरात 23 ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून सर्पदंश रोखण्याचा प्रकल्प आहे. परवाना देण्यात येणाऱया लोकांची यादी तयार केली जात आहे. सर्प या मोबाईल ऍपद्वारे लोक साप पकडण्यासाठी त्यांची सेवा घेऊ शकतील. आपत्कालीन स्थितीत ऍप सर्वात नजीकचे रुग्णालय आणि साप पडकणाऱयाविषयी माहिती देणार आहे. या ऍपमध्ये सर्पदंशानंतर औषधे उपलब्ध असणाऱया रुग्णालयांचीही माहिती असल्याचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे अधिकारी मोहम्मद अनवर यांनी सांगितले आहे.

भारतात सर्पदंश होणाऱया 4 पैकी प्रत्येक 2 जणांचा मृत्यू होता. तर एकजण पूर्णपणे दिव्यांग होतो. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत केरळमध्ये सर्पदंशाने होणाऱया मृत्यूंची संख्या खूपच कमी आहे. मागील 3 वर्षांमध्ये केरळमध्ये 334 जणांचा मृत्यू सर्पदंशामुळे ओढवला आहे. तर 1860 जणांचे जीव वाचविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणाचा उद्देश साप पकडणाऱयाची आणि सापाची सुरक्षा करणे असल्याचे अन्वर म्हणाले.

सापांना चुकीच्या पद्धतीने पकडण्यात येत असल्याने त्यांना नुकसान होत आहे. सापांना डोक्याने किंवा तोंड दाबून पकडण्यात आल्यास ते जखमी होतात. जंगलात सोडण्यात येणारे जखमी साप अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकत नाहीत. याचप्रकारे असुरक्षित पद्धतीने साप पकडणे संबंधितासाठीही धोकादायक असते.

Related Stories

राज्यात विकेंड कर्फ्यू लागू

Patil_p

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक; ‘या’ विषयांवर होणार चर्चा

datta jadhav

कोरोनाविरोधी युद्धात सैन्य ठरले उदाहरण

Patil_p

कोरोनाचा कहर : आता ‘या’ राज्यातही विकेंड कर्फ्यू

Rohan_P

काँगेस उत्तर प्रदेशात स्वबळावर लढणार

Patil_p

ममता बॅनर्जींचे अभिनंदन करत राज ठाकरे म्हणाले…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!