तरुण भारत

रुग्णांच्या रक्तनमुन्यात शिसे अन् निकेल धातू

आंध्रातील गूढ आजारासंबंधी खुलासा

विशाखापट्टणम

Advertisements

  आंध्रप्रदेशात आढळून आलेल्या गूढ आजाराविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. नव्या अहवालानुसार पश्चिम गोदावरी जिल्हय़ाच्या एलुरु शहरात गूढ आजाराने ग्रस्त रुग्णांच्या रक्तनमुन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात शिसे आणि निकेल धातूचे प्रमाण आढळून आले आहे. रक्तनमुन्यांमध्ये अधिक प्रमाणात आढळलेले शिसे आणि निकेल धातू या आजाराचे कारण असू शकतो, असे जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आणखीन नमुने पाठवत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. पश्चिम गोदावरी जिल्हय़ातील एलुरुमध्ये किटकनाशकांचा होणारा वापर या आजारासाठी कारणीभूत असल्याचेही म्हटले जात होते. या आजाराने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सुमारे 350 जण आजारी पडले आहेत. केंद्राचे आरोग्य पथक मंगळवारी आंध्रप्रदेशात पोहोचले आहे. आजारी लोक अचानकपणे बेशुद्ध होऊन त्यांच्या तोंडातून फेस येत होता. पाण्याची तपासणी केली असता ते प्रदूषित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Stories

अयोध्या : राममंदिरासाठी तामिळनाडूतून आली 613 किलोची घंटा

datta jadhav

अमिताभ बच्चन उत्तराखंडचे ब्रँड ऍम्बेसिडर

Patil_p

विमानतळावरील स्फोटात येमेनमध्ये 25 जण ठार

Patil_p

महाकाल मंदिराखाली आणखी एक मंदिर

Omkar B

दोन दिवसात ‘दीड लाख’पार

Patil_p

तीन दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा

Patil_p
error: Content is protected !!