तरुण भारत

सणासुदीत प्रवासी वाहन विक्री तेजीत

फाडाकडून माहिती सादर : विक्रीत विविध वाहनांचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑक्टोबर ते नोव्हेंबरमधील सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांकडून करण्यात आलेल्या मागणीमुळे प्रवासी वाहन विक्री ही वर्षाच्या आधारे जवळपास 4.17 टक्क्यांनी वधारुन 2,91,001 युनिट्सवर राहिली आहे, अशी माहिती वाहन डिलर्सची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) यांच्याकडून मंगळवारी देण्यात आली आहे.

फाडाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये दिवाळी सणामुळे वाहनांची नोंदणी वाढली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये प्रवासी वाहन विक्री 2,79,365 इतकी राहिली होती. यामध्ये विभागीय परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) 1,472 मधील 1,265 वाहनांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती फाडाने दिली आहे. मागणी चांगलीच वाढली असल्याचे दिसून आले आहे.

प्रमुख वाहनांची विक्री

उपलब्ध आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये दुचाकी वाहनांची विक्री ही 21.4 टक्क्यांनी घटून 14,13,378 युनिटवर राहिली आहे, जी एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत 17,98,201 राहिली होती. व्यावसायिक वाहनांची विक्री 31.22 टक्क्यांनी घटून 50,113 राहिली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये व्यावसायिक वाहनांची विक्री 72,863 संख्येवर राहिली होती. याच प्रकारे तीनचाकी वाहनांची विक्री ही 64.98 टक्क्यांनी घटून 24,185 वर राहिली आहे.

Related Stories

कीया मोटर्सची नवी सेल्टॉस दाखल

Patil_p

भारतात एएमजी कार्सचे उत्पादन सुरु

Patil_p

ट्रीम्पची नवी टायगर 850 स्पोर्टस सादर

Patil_p

नव्या होंडा झॅज कारचे प्री-बुकिंग सुरू

Patil_p

‘REVOLT 400’ च्या किंमतीत वाढ

tarunbharat

बीएस- 6 श्रेणीतील होंडा ग्रेझीया नव्या रुपात

Patil_p
error: Content is protected !!