तरुण भारत

चंद्रकांतदादांकडून शहरात जनसंवाद दौरा!

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगर भाजपच्या हालचाली सुरू : गाठीभेटींना प्रारंभ
स्थानिक नागरिकांशीही चर्चा, माजी नगरसेवकांना सूचना

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुढील वर्षीच्या मार्च किंवा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणुकीला अजून तीन चार महिन्यांचा अवधी असला तरी विविध राजकीय पक्षांनी नियोजन सुरू केले आहे. भाजपकडूनही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना प्रारंभ झाला आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारपासून शहरातील भाजपच्या (माजी) नगरसेवकांच्या प्रभागांच्या दौऱयाला प्रारंभ केला. प्रभागातील (माजी) नगरसेवकासह स्थानिक नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडचणी आणि मते जाणून घेण्यास प्रारंभ केला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आगामी काही दिवस कोल्हापुरात असणार आहेत. त्यामुळे महानगर भाजपने संवाद, गाठीभेटींच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी माजी विरोधी पक्ष नेते विजय सूर्यवंशी यांच्यासह किरण नकाते, भाग्यश्री शेटके, सविता भालकर या माजी नगरसेवकांच्या प्रभागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, विजय जाधव यांच्यासह सुहास लटोरे आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी नगरसेवकांना सूचना
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नकाते, सूर्यवंशी, शेटके आणि भालकर या माजी नगरसेवकांशीही चर्चा केली. त्यांनी केलेली कामे, मिळाले आलेल्या अडचणीची माहिती घेतली. भागातील राजकीय स्थितीविषयीही विचारणा केली. महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपली असली तरी नागरिकांशी कामे करा, समस्या सोडावा. त्यांच्याशी संपर्क वाढवा, अशा सूचनाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केल्या. बुधवारी रूईकर कॉलनीतील उमा इंगळे, शिवाजी पार्क येथील आशिष ढवळे या माजी नगरसेवकांसह इतर ठिकाणीही प्रदेशाध्यक्ष पाटील भेटी देणार आहेत.

महापालिकेत नेतृत्व कोण करणार ?
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व कोण करणार ? याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. माजी खासदार धनंजय महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यापैकी नेतृत्वाची धुरा कुणाकडे असणार याबद्दलही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

चंद्रकांतदादांची प्रतिष्ठा पणाला
नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्याने भाजप बॅकफूटवर गेला आहे. आगामी काळात सहकारातील निवडणुकांबरोबर कोल्हापूर महापालिकेची निवडणूकही आहे. गेल्या निवडणुकीत महापालिकेवर कमळ फुलविण्याचे स्वप्न अपुरे राहिले होते. यावेळी ताराराणीच्या मदतीने भाजपच्या जास्तीत जास्त जागा आणण्याचे आव्हान चंद्रकांत पाटील यांच्यापुढे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेशी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे.

Related Stories

कोल्हापूर : पुलाची शिरोलीत महावितरणचा कायमस्वरूपी अधिकारी मिळावा

triratna

कोल्हापूर : रंकाळा चौपाटीवर मद्याच्या बाटल्यांचा खच

triratna

‘आमचं ठरलंय’ला ‘आम्हाला पटलंय’ने प्रत्युत्तर

triratna

कोल्हापूर : यड्राव खूनप्रकरणी संशयित आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

triratna

कोल्हापूर : अजित पाटील यांनी खेळाबरोबर माणसे घडविली : न्यायधीश अश्विनी कदम

Shankar_P

कोरोचीतील पन्नास वर्षांची आठवण असलेली पाण्याची टाकी पाडली

Shankar_P
error: Content is protected !!