तरुण भारत

सातारमध्ये खुलेआम गुटखा विक्री

वार्ताहर/ शाहूपुरी

सातारा शहरात व उपनगरांतील परिसरात पोलिसांच्या हप्तेखोरी आणि पोखरलेल्या यंत्रणेमुळे गुटखा विक्री राजरोसपणे सुरु आहे.दिखाव्यापुरते कारवाईचे नाटक करुन लाखो रुपयांचा मलिदा लाटला जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, खुलेआम गुटखा विक्रीमुळे युवा वर्गाचे आयुष्य धोक्यात येणार असल्याने पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

Advertisements

        शासनाने गुटखा बंदीचा निर्णय घेतला असला तरी या आदेशाला धाब्यावर बसवून सातारा शहरात व उपनगरांतील परिसरात गुटखा विक्री राजरोसपणे सुरु आहे. गुटखाबंदी झाल्यानंतर सुरुवातीला काही 

काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. मात्र, गुटखा उत्पादक, विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखा विक्रीचे जाळे निर्माण केले. परराज्यातील गुजरात आणि कर्नाटक भागातून संपूर्ण महाराष्ट्रभर गुटखा विक्रीसाठी पाठवला जातो. हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असून एकटय़ा फलटण शहर परिसरात बेकायदा गुटखा विक्रीतून पाच कोटींची उलाढाल दरमहा होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

            शासनाने गुटखा बंदी लागू केली. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गुटखा सेवनाचे

प्रमाण जादा होते. त्यामुळे गुटखा बंदी लागू करण्यासाठी आघाडी सरकारने प्रयत्न केले. त्यावेळी

अनेक गुटखा उत्पादकांनी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयाने गुटखा बंदी लागू करण्याचे आदेश दिले. त्यावेळी राज्य सरकारने गुटखा विक्रीतून मिळणाया कोटय़वधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले होते. गुटखा बंदी

होवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती आहे. गुटखा बंदी नावापुरती आहे.

खेडोपाडय़ापासून ते मोठय़ा शहरात गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. गुटखा उत्पादक, बेकायदा

वितरक, विक्रेते यांनी गुटखा विक्रीची समांतर यंत्रणा उभी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

सातारा पालिकेचे पुन्हा शटर डाऊन

triratna

12 गुन्हय़ातील फरारी चोरटय़ास कर्नाटकातून अटक

Patil_p

महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती! कोरोना रुग्ण संख्या 32.29 लाख पार

pradnya p

पश्चिम भागात पावसाचा जोर

Patil_p

सोलापूर : माढा तालुक्यात ३६ कोरोनाबाधितांची भर

Shankar_P

धुरळा उडवणारे अडकणार आता कायदयाच्या कचाटयात

Patil_p
error: Content is protected !!