तरुण भारत

कोरोना रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स न लावण्याचे न्यायालयाचे आदेश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स न लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. कोरोना रुग्णाच्या घराबाहेरील पोस्टर्स लावणे बंद करण्यासाठी दाखल असलेल्या याचिकेवर न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठाणे आज निकाल दिला. 

Advertisements

कोरोना रुग्णाच्या घराबाहेर संबंधित प्रशासकिय विभागाने पोस्टर्स लावल्यानंतर घरातील नागरिकांना अस्पृश्याप्रमाणे वागणूक मिळते. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बाधितांच्या घराबाहेर पोस्टर्स लावण्यामागे इतर नागरिकांची सुरक्षा हाच केंद्र सरकारचा उद्देश असला तरीही ते दुष्परिणाम भीषण आहेत. 

त्यामुळे आता केवळ आपत्ती निवारण अधिनियमांतर्गत अधिकाऱ्यांना विशिष्ट प्रकरणातच रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर्स लावता येऊ शकतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

प्रथम तरुणांना लस द्या : खा. मल्लिकार्जून खर्गें

Abhijeet Shinde

यमुना एक्स्प्रेस वेवर 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या; 3 ठार

datta jadhav

प.बंगाल : पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव

datta jadhav

आंध्र प्रदेशात 20 जूनपर्यंत वाढविला कोरोना कर्फ्यू!

Rohan_P

अरविंद केजरीवाल म्हणजे दहशतवादी : प्रकाश जावडेकर

prashant_c

19 जूनला होणार राज्यसभेच्या केवळ 18 जागांसाठी निवडणूक

Rohan_P
error: Content is protected !!