तरुण भारत

मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक लँड रिफॉर्म्स (दुरुस्ती) विधेयक, २०२० मंजूर केल्यांनतर विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्नाटक विधानपरिषदेच्या विरोधात निदर्शने सुरु केली आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी शेतकऱ्यांना निषेध करू नये, असे आवाहन केले आणि सरकारशी चर्चा करून समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले.

मी शेतकरी नेत्यांना निवेदन करतो की तुम्ही निषेध करु नका, काल तुम्ही बंद आंदोलन करा, कृपया सरकारला बसावे व चर्चा करा, समस्या सोडवा. आमचे सरकार आणि नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व काही करीत आहेत. दरम्यान कर्नाटक विधानपरिषदेविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यासाठी शेतकरी, कामगार आणि कन्नड समर्थक संघटनांचे सदस्य विचार करीत आहेत.

मंगळवारी कर्नाटकमधील भाजप सरकारने जेडीएस च्या मदतीने विधानपरिषदेत जमीन मालकी सुधारणांचे विधेयक मंजूर केले. परंतु काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात मत मत नोंदविले.

बुधवारी सकाळीशेतकऱ्यांनी राज्याच्या राजधानीत आंदोलन तीव्र केले आहे. विविध जिल्ह्यांतील शेतकरी बेंगळूरमध्ये दाखल झाले आणि बेंगळूर रेल्वे स्थानकासमोर आंदोलन करण्यास सुरवात केली आहे.

Advertisements

Related Stories

22 पासून महाराष्ट्रासाठी कर्नाटकातून बससेवा

Patil_p

खासगी विद्यापीठ विधेयक विधानपरिषदेत संमत

Amit Kulkarni

कर्नाटक सरकार विरोधात शिवसेनेचा एल्गार

Sumit Tambekar

सरकारच्या आश्वासनानंतर मिड-डे मील कर्मचाऱ्यांचा संप मागे

Abhijeet Shinde

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३ हजाराहून अधिक नागरिकांना दंड

Abhijeet Shinde

कर्नाटक: पद्मश्री बी. गोविंदाचार्य यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!