तरुण भारत

दिल्लीत 2,463 नवे कोरोना रुग्ण; 50 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


मागील 24 तासात दिल्लीत 2 हजार 463 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 50 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 99 हजार 575 वर पोहचली आहे. यामधील 20, 546 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements


दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 4, 177 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 5 लाख 69 हजार 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 9,813 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 69 लाख 41 हजार 407 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 32,976 आरटीपीसीआर टेस्ट आणि 39,103  रैपिड एंटिजेन टेस्ट सोमवारी एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

वरिष्ठ कमांडरसह दोघांचा खात्मा

Patil_p

ब्लॅक फंगसवरील औषधे करमुक्त

Patil_p

हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते म्हणणाऱ्या गुलाबरावांना खासदार अभिनेत्रीने दिले उत्तर

Sumit Tambekar

कुलभूषण जाधव यांच्याकडून पुनर्विचार याचिकेस नकार

Patil_p

उत्तराखंडात 8,390 नवे कोरोना रुग्ण; 118 मृत्यू

Rohan_P

जमीन बळकाविण्याचा आरोप, गमाविले मंत्रिपद

Patil_p
error: Content is protected !!