तरुण भारत

कुंभी कासारीची प्रतिटन ३११९ रुपये संपूर्ण, एफआरपी ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग


 वाकरे/ प्रतिनिधी 


कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याने सन २०२०-२१ च्या गळीत हंगामातील प्रतिटन ३११९ रुपये संपूर्ण एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकरी सभासद व बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकारांना दिली. 

Advertisements


          चेअरमन नरके यांनी दिलेली माहिती अशी की १५ नोव्हेंबरपर्यंत कारखान्याकडे गळीतासाठी आलेल्या उसाची संपूर्ण एफआरपी ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केली असून ऊस उत्पादकांनी बँकेशी संपर्क साधावा असे ते म्हणाले. यावर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याने आजपर्यंत १ लाख ३८ हजार ५४० मेट्रिक टन ऊस गाळप करून १ लाख ५१ हजार ७० साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.२४ टक्के आहे.कारखान्याचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतासाठी पाठवून सहकार्य करावे असे ते म्हणाले.


            यावर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याची डिस्टीलरी आणि सहवीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू असल्याचे त्यांनी सांगितले.हंगाम सुरळीत सुरू होण्यासाठी सभासद,ऊस तोडणीदार ,ओढणीदार, कंत्राटदार,वाहतूकदार,कामगार यांचे सहकार्य मिळत असल्याचे ते म्हणाले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन निवास वातकर, कार्यकारी संचालक अशोक पाटील,चीफ अकाउंट अनिल यादव उपस्थित होते.
             
           कुंभीची ३११९ उच्चांकी एफआरपी 
या वर्षीच्या गळीत हंगामात कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची प्रतिटन ३११९ रुपये उच्चांकी एफआरपी जिल्ह्यात अग्रस्थानी आहे.

Related Stories

पर्यटन – मोठी संधी

Patil_p

कर्नाटक : भाजप समर्थित मौलाना शफी सादी यांची वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड

Sumit Tambekar

नरंदेत कोरोनाचे दोन रुग्ण

Abhijeet Shinde

कर्नाटक : छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीची पतीविरोधात बलात्काराची तक्रार

Sumit Tambekar

जगात निर्दोष शासक मिळणे कठीण आहे

Rohan_P

क्षारपड जमीन सुधारण्यासाठी केंद्राचे अनुदान मंजूर : ‘दत्त”चे चेअरमन गणपतराव पाटील

Sumit Tambekar
error: Content is protected !!