तरुण भारत

सातारा : राजवाडा-नगरपालिका रस्त्याचे डांबरीकरण

शाहूपुरी : सातारा शहरातील मुख्य मार्ग  असलेल्या राजपथावरील राजवाडा ते नगरपालिका कार्यालयपर्यंतच्या मार्गावरील ४० ब्रास धूळमाती झाडून काढण्यात आली आहे. पालिकेच्यावतीने या मार्गावरील डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून, मागील तीन-चार दिवसांपासून डांबरीकरणाला सुरुवात झाल्याने रस्ता चकाचक झाला आहे.

नगरपालिका ते राजवाडा या रस्त्यात एकूण ४० ब्रास धूळमाती काढून ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साह्याने दुसरीकडे टाकण्यात आली आहे.पावसाळ्यानंतर येथून ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे ही धूळ दिसून येत होती, तर रस्त्यावरील वाहने व रस्त्याकडेला असणाऱ्या लोकांना तिथून मोठ्या प्रमाणात उडत होती. यामुळे या रस्त्याची स्वच्छता करून डांबरीकरण केल्याने रस्ता चकाचक बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग वाढला असून वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisements

Related Stories

आमदार शिवेंद्रराजेंचे समर्थक वाईकर राष्ट्रवादीत

Abhijeet Shinde

सातारकरांवर मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांची दहशत

Amit Kulkarni

कराडमध्ये प्रभागनिहाय लसीकरण केंद्र बंद

Amit Kulkarni

दौलतनगरमध्ये युवतीसह कुटुंबियांना मारहाण

Patil_p

भरधाव कारने दुचाक्यांचा केला चुराडा; दोन जण जखमी

Abhijeet Shinde

पुसेगाव-म्हासुर्णे रस्त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

datta jadhav
error: Content is protected !!