तरुण भारत

तमिळ अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

हॉटेलच्या खोलीत लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

वृत्तसंस्था / चेन्नई

तमिळ अभिनेत्री आणि प्रख्यात वीजे चित्रा कामराज यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. चित्रा या 29 वर्षांच्या होत्या. त्यांचा मृतदेह चेन्नईच्या नजरथपेट येथील एका हॉटेलच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या स्थितीत बुधवारी आढळला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.

संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकाने रात्री 2.30 ते 2.45 वाजण्याच्या सुमारास पोलीस हेल्पलाईनवर कॉल करून घटनेची माहिती दिली होती. माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याचे नजरथपेट पोलिसांनी सांगितले आहे.

चित्रा या तमिळ टीव्ही जगतातील प्रख्यात अभिनेत्री तसेच वीजे होत्या. अलिकडेच त्यांनी उद्योजक हेमंत यांच्याशी साखरपुडा केला होता. हॉटेलमध्ये चित्रा त्याच्यासोबतच राहत होत्या, अशी माहिती समोर येत आहे.

चित्रा कामराज समाजमाध्यमांवर अत्यंत सक्रीय असायच्या. मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्यांनी अंतिम पोस्ट केली होती, ज्यात एक छायाचित्र होते. या छायाचित्रात त्या हसऱया भावमुद्रेत दिसून येत होत्या.

Related Stories

पर्युषण काळात मुंबईतील तीन जैन मंदिरे उघडणार

Patil_p

सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा 3 लाखांवर

Patil_p

हिंमत असल्यास अटक करून दाखवा!

Omkar B

चोवीस तासात आढळले जवळपास 48 हजार रुग्ण

Patil_p

मोटेरा स्टेडिअमवरील ट्रम्प यांच्या स्वागताची कमान कोसळली

tarunbharat

दिल्लीत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

datta jadhav
error: Content is protected !!