तरुण भारत

आयसीआयसीआय लोम्बार्ड-प्लमची नवीन समूह आरोग्य विमा योजना

भारतात प्रथमच तंत्रज्ञानावर आधारित योजनेचा शुभारंभ

वृत्तसंस्था / मुंबई 

Advertisements

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने कर्मचारी आरोग्य विमा क्षेत्रातील वेगाने वाढणारा स्टार्टअप प्लम या कंपनीच्या सहाय्याने ग्राहकांसाठी तांत्रिक आविष्कारांचा मिलाफ असलेल्या अनोख्या समूह आरोग्य विमा पॉलिसी आणल्या आहेत. पूर्णपणे नवीन संकल्पनांवर तयार केलेल्या आणि ऑनलाईन तंत्रज्ञानाचा संयोग असलेल्या या विमा पॉलिसी देशातील अशा प्रकारच्या पहिल्याच पॉलिसी आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत समूह विमा पॉलिसी क्षेत्रात कालनिहाय मूल्यनिर्धारण, विमाधारक कर्मचाऱयांचा थेट सहभाग, पॉलिसीचे व्यवस्थापन आणि दावे या चार घटकांमधील सध्याचे अडथळे दूर करत सुसूत्रता आणण्याचा आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि प्लम यांचा मनोदय आहे.

आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि प्लम यांच्यातील भागिदारी ही प्रामुख्याने समूह आरोग्य विमा बाजाराला लाभदायक ठरण्यासाठी त्याचबरोबर आरोग्य विम्याची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. सध्या समूह आरोग्य विमा पॉलिसीचे मूल्य निर्धारित करण्यासाठी विमा कंपन्यांना पाच दिवसांपासून अनेक आठवडय़ांचा कालावधी लागतो. सांख्यिकी माहितीचे संकलन-विश्लेषण आणि जोखीम निश्चित करण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि प्लम यांनी स्वयंचलित प्रक्रिया तयार केल्याने अवघ्या काही मिनिटात पॉलिसीचे मूल्यनिर्धारण निश्चित करता येते. कंपन्या या नवीन योजनांच्या माहितीसाठी www.ज्त्ल्स्प्.म्दस् या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात आणि तेथे विचारल्या गेलेल्या काही सोप्या प्रश्नांना उत्तरे देऊन अवघ्या काही मिनिटात आपले मूल्यनिर्धारण निश्चित करु शकतात. त्यानंतर संबंधित कंपनी पोर्टलवर आपली माहिती (डाटा) भरु शकतील आणि हप्ता भरताच तत्काळ पॉलिसीसुद्धा सक्रीय करु शकतील. पॉलिसी काढण्यासाठी लागणारा सरासरी एक महिन्याचा वेळ अवघ्या एक तासावर आला आहे.

नवीन पॉलिसी सुरु केल्यानंतर पहिल्या सहामाहीतच आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि प्लमने शंभरपेक्षा अधिक कंपन्यांना समूह आरोग्य विमा योजनेच्या कक्षेत आणले. या कंपन्यांमध्ये फॅमपे, स्टेअबोड, पोसिस्ट, जिनी, रिव्ह, स्विफलर्न, द लेबल लाईफ आणि ग्रोफिट यासारख्या स्टार्टअपचा समावेश आहे.

Related Stories

रियलमीचा स्लीम लॅपटॉप सादर

Patil_p

टाटा पॉवरच्या ईव्ही चार्जिंग स्टेशन्सची संख्या 1,000 च्या घरात

Patil_p

गुगलचे प्रगती ओएस मेड फॉर इंडिया स्मार्टफोनसाठी

Patil_p

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी बाजार कोसळला

Patil_p

बालाजी वेफर्सचा नवा प्रकल्प

Patil_p

जाणून घ्या ओलाच्या नवीन ऍपविषयी

Patil_p
error: Content is protected !!