तरुण भारत

कणकुंबीनजीक 63 लिटर मद्य जप्त, एकाची कारागृहात रवानगी

खानापूर : कणकुंबी तपास नाका व खानापूर अबकारी पथकाने बेळगाव-पणजी व्हाया चोर्ला महामार्गावर गस्त घालत असताना वाहनातून 63 लिटर गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक करणाऱयास अटक केली. या प्रकरणी मौनेश आबाळेप्पा होसमणी (वय 21, रा. एण्णीवडगिरी ता. सुरपूर जि. यादगीर, सध्या रा. फोंडा गोवा) याला अटक केली. त्याच्याकडील दारूसाठा जप्त करण्यात आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईमध्ये प्रभारी उपनिरीक्षक चालुक्मय शहापूर, मंजुनाथ बळगपण्णावर, महांतेश वग्गी, प्रवीण यड्रावी, हणमंत नागनूर, विजयलक्ष्मी बडदाळे यांनी भाग घेतला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 5 लाख 12 हजार इतकी आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातून राज्यात होणारी अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी अबकारी भरारी पथके व तपासणी नाके सुरू केले आहेत. तेथे ही कारवाई करण्यात आली.

Related Stories

पूरग्रस्तांचे मंत्रिमहोदयांसमोर गाऱहाणे

Patil_p

भाग्यनगर येथे गणेशमूर्ती मिरवणूक

Patil_p

वयस्कर धावपटू सुरेश देवरमनी यांचे विविध स्पर्धेत यश

Patil_p

‘त्या’ जोडगोळीची कारागृहात रवानगी

Patil_p

हुक्केरीत ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार

Patil_p

होनगा येथील मंदिरांच्या ट्रस्टी- पुजाऱयाची चौकशी करा

Patil_p
error: Content is protected !!