तरुण भारत

बेळगावात मराठा सेंटरचा भरती मेळावा 15 पासून

उमेदवारांसाठी कोरोनाचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट अनिवार्य :

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे 15 डिसेंबरपासून शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅली ही लष्कराशी संबंधित कुटुंबातील युवकांसाठी, वीर नारींच्या मुलांसाठी किंवा माजी सैनिकांची मुले अथवा भाऊ यांच्यासाठीच आहे.

सोल्जर जनरल डय़ुटी, सोल्जर टेडमन (10 वी पास), सोल्जर टेडमन (8 वी पास) आणि सोल्जर क्लार्क/ एसकेटी या श्रेणीसाठी हा भरती मेळावा आयोजित केला आहे. सदर मेळावा 15 ते 19 डिसेंबर आणि 21 ते 23 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार असून 31 जानेवारी 2021 व 28 फेब्रुवारी 2021 रोजी लेखी परीक्षा होणार आहे. उमेदवारांसाठी कोरोनाचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट अनिवार्य असणार आहे.

सोल्जर जनरल डय़ुटी श्रेणीसाठी उमेदवाराचे वय 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्षे इतके असावे. त्याचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 च्या आधी आणि 1 एप्रिल 2003 नंतर झालेला नसावा. सोल्जर टेडमन आणि सोल्जर क्लार्क/एसकेटी श्रेणीसाठी उमेदवाराचे वय 17 वर्षे 6 महिने ते 23 वर्षे इतके असावे. त्याचा जन्म 1 ऑक्टोबर 1997 च्या आधी आणि 1 एप्रिल 2003 नंतर झालेला नसावा.

सोल्जर जनरल डय़ुटीसाठी एसएसएलसीला किमान 45 टक्के गुण असावेत व प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण असावेत. सोल्जर टेडमनसाठी किमान एसएसएलसी उत्तीर्ण असणे आवश्यक व प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असणे आवश्यक आहे. सोल्जर टेड्समनसाठी 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असणे आवश्यक आहे. सोल्जर क्लार्क पदासाठी पीयुसी उत्तीर्ण असणे आवश्यक असून किमान 60 टक्के गुण असले पाहिजे. प्रत्येक विषयात 50 टक्के व प्रामुख्याने इंग्लिश आणि गणित विषयात 50 टक्के गुण असणे बंधनकारक आहे.

खेळाडूंसाठीसुद्धा भरती

खेळाडूंसाठीसुद्धा भरती असून, उमेदवारांनी राज्य किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले असावे. ज्या खेळाडूंनी राज्य आणि जिल्हा पातळीवर गेल्या दोन वर्षात खेळामध्ये प्रथम किंवा द्वितीय क्रमांक मिळविला आहे त्यांनाही अर्ज करता येईल. मात्र, भरतीवेळी त्यांनी सर्व प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

भरतीला येऊ इच्छीणाऱया उमेदवारांच्या शरीरावर दर्शनी दिसू शकेल असा टॅटू नसावा, ढोपरापासून मनगटापर्यंत आतल्या बाजूंनी कायमस्वरुपी टॅटू असल्यास चालेल. सर्व उमेदवारांनी आपली मूळ प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्रे, चारित्र्याचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, राष्ट्रीय कायमस्वरुपी पत्ता, एनसीसीची प्रमाणपत्रे, अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र व पासपोर्ट साईज 25 फोटो आणणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांचे दोन संच असले पाहिजेत. 

दि. 15 ते 23 डिसेंबरपर्यंत फिजिकल फिटनेस व मेजरमेंट टेस्ट होईल. 31 जानेवारी 2021 रोजी सोल्जर क्लार्क पदासाठी लेखी परीक्षा होईल. 28 फेब्रुवारी रोजी सोल्जर जनरल डय़ुटी व सोल्जर टेड्समन यांच्यासाठी लेखी परीक्षा होईल. पात्र उमेदवारांनी भरतीच्या ठराविक दिवशी ठीक पहाटे 5 वाजता शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे हजर राहणे आवश्यक आहे.

अत्यंत महत्त्वाची सूचना

भरती मेळाव्याला येणाऱया इच्छुक उमेदवारांनी कोरोना नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र व ‘नो रिस्क’ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्रावर सरकारी हॉस्पिटलचा शिक्का, डॉक्टरचे नाव व नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे. अन्यथा, सदर उमेदवार मेळाव्यात भाग घेण्यास पात्र ठरणार नाही, असे कळविण्यात आले आहे.

पुढीलप्रमाणे छाननी प्रक्रिया

शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणीद्वारे पुढीलप्रमाणे छाननी प्रक्रिया होईल. 15 डिसेंबर रोजी सोल्जर जनरल डय़ुटी उत्कृष्ट खेळाडूंसाठी छाननी (फक्त महाराष्ट्र राज्य मर्यादित). 16 डिसेंबर रोजी सोल्जर जनरल डय़ुटी उत्कृष्ट खेळाडू छाननी (महाराष्ट्र वगळता देशातील सर्व दर्जासाठी-एआयएसी) 17 व 18 डिसेंबर रोजी सोल्जर जनरल डय़ुटी छाननी (फक्त महाराष्ट्र राज्य मर्यादित). 19 डिसेंबर रोजी सोल्जर जनरल डय़ुटी छाननी (फक्त मध्यप्रदेश व छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांसाठी मर्यादित). 21 रोजी सोल्जर टेड्समन छाननी (फक्त महाराष्ट्र राज्य मर्यादित). 22 डिसेंबर रोजी  सोल्जर टेड्समन छाननी (महाराष्ट्र वगळता देशातील सर्व दर्जासाठी-एआयएसी). 23 डिसेंबर रोजी सोल्जर क्लार्क / स्टोरकीपर टेक्निशियन (एसकेटी) देशातील सर्व दर्जासाठी-एआयएसी (एमएलआयआरसीशी संबंधित लोकांसाठी मर्यादित).

Related Stories

सीबीटीच्या तळमजल्यासाठी तब्बल चार वर्षे!

Amit Kulkarni

विनामास्क फिरणाऱयांकडून 1 लाख 72 हजारचा दंड वसूल

Patil_p

कॅन्टोन्मेंटकडे निधी नसतानाही दुरुस्तीचे काम सुरूच

Amit Kulkarni

कारखान्यांनी 15 दिवसांत शेतकऱयांच्या खात्यावर बिले जमा करावीत

Patil_p

मैत्री क्लबतर्फे शहरात प्रथमच ‘पिंक टॉयलेट’

Omkar B

गरजूंना होणार अडीच हजार जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

Patil_p
error: Content is protected !!