तरुण भारत

बेळगाव दक्षिण विभागात ग़्17 ठिकाणी अबकारी छापे

तिघा जणांना अटक : चार वाहने-मद्यसाठा जप्त

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा गावठी दारू अड्डय़ांवर छापे टाकले जात आहेत. बेळगाव दक्षिण विभागात 17 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

अबकारी विभागाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. बुधवारी 17 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. आता रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे. एकूण 5 प्रकरणे दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.

या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली असून 8 हजार 980 लिटर बेकायदा दारूसाठा, 120 लिटर गावठी दारू व चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण 85 हजार 492 रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

एपीएमसी बाजारात कांदा दरात वाढ

Amit Kulkarni

हिंदवाडी येथे भरदिवसा घरफोडी

Amit Kulkarni

गटार बांधकामामुळे जलवाहिनी फुटल्याने नुकसान

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील 9 गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

Patil_p

जायंट्स सखीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार

Patil_p

मंगळवारी 290 वकिलांना लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!