तरुण भारत

जि.पंचायतीसाठी बेतकी खांडोळय़ात रंगणार तिरंगी लढत

आजी-माजी आमदारांनी लावला जोर : विधानसभेच्या सेमिफायनलची तयारी 

वार्ताहर / माशेल

Advertisements

जिल्हा पंचायत निवडणूक ही विधानसभा निवडणूकीसाठी सेमिफायनल ठरलेली आहे. त्यामुळे आजी व माजी आमदारांसाठी प्रतिष्ठेची झालेली आहे. यंदा प्रियोळ मतदारसंघातही हीच स्थिती जाणवू लागली आहे. सद्याचे स्थानिक आमदार गोविंद गावडे व माजी आमदार दिपक ढवळीकर यांनी आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे तिहेरी होणाऱया निवडणूकीत रंगत वाढली आहे. यंदा बेतकी खांडोळा जिल्हा पंचायत निवडणूक प्रभागातून तिहेरी लढत होणार आहे. भाजपातर्फे श्रमेश भोसले, मगोतर्फे विश्वजीत नाईक तर अपक्ष म्हणून नोनू नाईक रिंगणात आहेत.

बेतकी-खांडोळा जिल्हा पंचायतीत एकूण मतदान 17912 असून त्यात 8820 पुरूष तर 9092 महिलांचा समावेश आहे. या प्रभागातून एकूण 26 बुथवर  मतदानासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहे. या मतदार संघात पाच पंचायतीचा समावेश आहे. बेतकी खांडोळा, तिवरे वरगांव, भोम अडकोण, केरी, वळवई अशा पाच पंचायतीचा समावेश आहे.

भाजपा उमेदवार श्रमेश भोसले हे तिवरे वरगांव पंचायतीच्या माजी सरपंच स्मिता भोसले यांचे सुपुत्र असून त्याने जनसंपर्कावर भर दिलेला आहे. माजी सरपंच म्हणून काम करताना स्मिता यांनी अनेक महिला मंडळे तसेच स्वयंसहाय्य गटात सहभागी असल्याने याचा फायदा थेट श्रमेश यांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविताना स्थानिक आमदाराचा पाठिंबा लाभलेला आहे. व्यवसायिक या नात्याने अनेक व्यवसायिकांशी व युवावर्गाशी चांगले संबंध आहेत. स्थनिक आमदार गोविंद गावडे यांनी केरी, वळवई , बेतकी, खांडोळा, भोम अडकोण, तिवरे वरगांव पंचायतीत केलेल्या विकासकामांचा फायदा निश्चितच उमेदवाराला होणार आहे. पाचही पंचायत क्षेत्रात चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे श्रमेश यांचे म्हणणे आहे.

दिपक ढवळीकरसाठी जि.प. निवडणूक प्रतिष्ठेची

मगोचे उमेदवार विश्वजीत नाईक हे भोम अडकोण पंचायतीचे उपसरपंच असून पंचायत क्षेत्रात सर्वाचे परिचीत आहेत. मगो पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन केलेले आहे. विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पक्षाचे कार्यकर्तेही नव्या जोमाने कामाला लागले असून सत्ताधारी भाजपाला कडवी लढत मगोकडून मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. माजी मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही प्रचाराला जोर लावला असून निवडणून जाहीर होण्यापुर्वीच प्रचारधुमाळी सुरू केली होती. तसेच मागीलवेळच्या जि.प.सदस्य  बबिता गावकर याही मगोच्या पाठीशी खंबीर आहेत. त्याच्यामते केरी, वळवई येथे चांगला प्रतिसाद लाभत असून सर्व पंचायतीतून चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

नोनू नाईक यांचा जनसंपर्कावर भर

नोनू नाईक हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. ते बेतकी खांडोळा पंचायतीचे माजी पंचसदस्य आहेत त्य़ामुळे संपुर्ण परिसरात ते परिचीत आहेत. स्वत: व्यवसायिक असल्याचे संपुर्ण माशेल भागातील लोकांशी संपर्कात आहेत. त्यांनी प्रत्येक पंचायतीना भेटी घेऊन जनसंपर्कावर भर दिलेला आहे. अनेक सामाजिक संघटनेत त्याचा सहभाग असून कोरोनाच्या सावटात फक्त कोपरा बैठका व घरोघरी प्रचारावर भर दिलेला आहे.भाजपा व मगोच्या लढाईत अपक्ष म्हणून किती मते आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळवतात याकडे मतदारांचे लक्ष लागून राहणार आहे. 

एकंदरीत ही लढत तिरंगी होणार असून यात कोण बाजी मारेल यासाठी 14 डिसें. वाट पहावी लागणार. तिन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. मात्र निवडणूकीबाबत मतदारांमध्ये उत्साह अजिबात दिसत नाही. त्यामुळे उमेदवारांची मदार ही पत्रकार परिषदातून केलेले आवाहन हेच अपक्ष उमेदवारांनी हातखंडा वापरलेला आहे. तसेच सोशल मिडीयावरूनही प्रचाराला उमेदवारांनी यावेळी पसंती दिलेली आहे.  

Related Stories

आजपासून दिव्याचा… प्रकाशाचा महोत्सव

Patil_p

मोलेत परप्रांतीय वाहनांच्या गर्दीवरुन ग्रामस्थ संतप्त

Omkar B

प्रतापसिंह राणे यांना पुन्हा निवडणुकीत उतरण्याचा आग्रह

Amit Kulkarni

भूमीपुत्र विधेयकावर चर्चेसाठी रविवारी चलो वाळपई

Omkar B

कोरोनाच्या सकारात्मक बातम्याही प्रसिद्ध कराव्या

Patil_p

फुटबॉल महासंघाच्या फातोर्डा प्रशिक्षण केंद्राचे टोनी काब्रालचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!