तरुण भारत

सांगली : डॉ. आंबेडकर क्रीडांगणाचा कायापालट होणार; वॉकिंग ट्रॅकसह विद्युत व्यवस्था होणार


सांगली / प्रतिनिधी


प्रचंड दुरवस्था झालेले शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाचा लवकरच कायापालट होणार आहे. मनपा आयुक्त नितिन कापडणीस यांच्या संकल्पनेतून क्रीडांगणाचा विकास होणार आहे. क्रीडांगणाच्या स्वच्छता आणि सपाटीकरण कामास सुरवात झाली असून संपूर्ण क्रीडांगणाचे सपाटीकरण करून चोहो बाजुनी वॉकिंग ट्रॅक केला जाणार आहे.

Advertisements

सांगली शहराच्या मध्यवर्ती डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण आहे. क्रीडांगणाचा विकास करण्याची मागणी अनेक क्रीडा संघटना, खेळाडू, नागरिकांच्या मधून होत होती. यानुसार या क्रीडांगणामध्ये विविध खेळांचे ग्राउंड, नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक तसेच खोखो कबड्डी हॉलीबॉल तसेच कमी जागेतील खेळ यासाठी हे क्रीडांगण सुसज्ज केले जाणार आहे. या क्रीडांगणाच्या चोहोबाजुंनी आकर्षक विद्युत व्यवस्था केली जाणार असून संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखेखाली असणार आहे. याचबरोबर क्रीडांगणाच्या आवारात असणाऱ्या पॅव्हेलीनमध्ये महापालिका क्रीडाधिकारी यांचे कार्यालय सुरू केले जाणार असून या क्रीडांगणाचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.

Related Stories

सांगली : शिराळा येथे गोठ्यास आग; बैलासह पाच जनावरांचा होरपळून मृत्यू

Abhijeet Shinde

बजरंग गावडे यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde

सांगली .. तर ग्राम दक्षता समिती व सरपंच यांची गय केली जाणार नाही

Abhijeet Shinde

नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशनचे मुख्यमंत्री सहायता निधीस चार लाख

Abhijeet Shinde

विठोबाराय एसटीने निघाले आळंदीला…

Abhijeet Shinde

मायक्रो फायनान्स कंपन्याबद्दल तक्रारी निराकरणासाठी टोल फ्री क्रमांक सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!