तरुण भारत

देशात चाचण्यांचा वेग वाढला; एकूण संख्या 15 कोटीच्या पुढे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जागतिक महामारीच्या विरूद्ध लढ्यात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. चाचण्यांची एकूण संख्या 15 कोटीच्या पुढे गेली आहे.

Advertisements

गेल्या 24  तासांत,9,22,959 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यामुळे  भारताची चाचण्यांची एकूण संख्या  वाढून 15,07,59,726  झाली आहे.

शेवटच्या एक कोटी चाचण्या केवळ 10 दिवसात करण्यात आल्या. सातत्याने सर्वसमावेशक आणि व्यापक चाचण्या केल्यामुळे सकारात्मकता दर खाली आला आहे.

अन्य एका महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये, सलग अकरा दिवस भारतामध्ये दररोज 40,000 पेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात देशात केवळ 31,521 व्यक्ती कोविड बाधित असल्याचे आढळले.

Related Stories

पत्रकारांसाठी मध्य प्रदेश सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Abhijeet Shinde

व्ही. के. भवरा पंजाबचे नवे डीजीपी

Patil_p

खासगी इस्पितळांमध्ये कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी दर निश्चित

Patil_p

‘त्या’ दहशतवाद्यांच्या अटकेनंतर मध्यप्रदेशात रेड अलर्ट

datta jadhav

100 देशांना लसपुरवठा…

Patil_p

कोरोना लसीबाबत शुभसंकेत

Patil_p
error: Content is protected !!