तरुण भारत

दापोली खरेदी विक्री संघात भात खरेदीचा शुभारंभ ठरला

प्रतिनिधी / दापोली

दापोली खरेदी विक्री संघ दापोली यांच्या दि महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन ली. मुंबई रत्नागिरी तर्फे महाराष्ट्र शासनाच्या भात खरेदी योजना 2020-21 चा शुभारंभ शनिवारी 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. संघाच्या कार्यालयात संघाचे अध्यक्ष सुधीर कालेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने ‘अ’ प्रतीच्या भातासाठी 1818 रू. प्रती क्विंटल व सर्वसाधारण भातासाठी 1868 रू. प्रती क्विंटल दर जाहीर केलेला असून त्यासाठी सदरील शेतकऱ्यांचे अद्ययावत सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, जन्मतारीख, मोबाईल नंबर या कागदपत्रांची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात खरेदी योजनेत भात विक्रीस आणून त्याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर कालेकर व संघाचे प्र.व्यवस्थापक किरण बांद्रे यांनी केले आहे.

Advertisements

Related Stories

महसूल विभागाची अवैध वाळू उपसावर कारवाई

Ganeshprasad Gogate

उद्योगांना प्रोत्साहन देऊन कोकणातील जनतेच्या हातास रोजगार देईन

NIKHIL_N

दुचाकीस्वार दरीत कोसळलाय…

NIKHIL_N

..तो भागवतोय कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी, वाटसरूंची तहान

Patil_p

जिल्हय़ात आणखी 17 पॉझिटिव्ह

NIKHIL_N

सीईटीपी अध्यक्षपदी सतीश वाघ

Patil_p
error: Content is protected !!