तरुण भारत

कर्नाटक: ग्रामीण भागात उत्तम परिवहन सेवा देणार : सवदी

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यातील ग्रामीण भागात वाहतुकीच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) ताफ्यात लवकरच ४ हजार बसेस असतील अशी माहिती उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली.

महामंडळांना आवश्यकतेनुसार बस दिली जाणार
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी आमदार लिंगेश कुमार, जी. टी. देवेगौडा आणि हर्षवर्धन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सवदी यांनी राज्यातील सर्व परिवहन महामंडळांना आवश्यकतेनुसार बस पुरविण्यात येतील. राज्यातील विविध परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी मानणे शक्य नाही. भविष्यात या मागणीवर चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले.

नोव्हेंबर महिन्यापर्यंत परिवहन महामंडळातील सर्व कर्मचार्‍यांना थकबाकी देण्यात आली आहे. गेल्या सात महिन्यांपासून मनपाला वेतन देता आले नाही. राज्य शासनाने पगार थकबाकी भरण्यासाठी ७५ टक्के विशेष अनुदान जाहीर केले.

Advertisements

Related Stories

ऍमेझॉनने 35 शहरात वाढवली सेवा

Patil_p

…तर अनुकंपा तत्त्वावर विवाहीत मुलीला नोकरी

Patil_p

अमेझॉनच्या घनदाट जंगलात उकळणाऱया पाण्याची नदी

Patil_p

बेंगळूर : मुख्यमंत्री बेंगळूर मिशन २०२२ ला प्रारंभ करणार

Abhijeet Shinde

मुलांसाठी बेड्स राखीव ठेवावेत

Amit Kulkarni

बेंगळूर: शहरात ड्रग्स तस्करी होणार असल्याने पोलिसांकडून वाहनांची तपासणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!