तरुण भारत

शेतकऱ्यांच्या वाढत्या विज तक्रारींच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी घेतली आढावा बैठक

प्रतिनिधी / उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यावर्षी वार्षिक सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विजेचा वापर वाढला असून या वाढत्या विजेच्या वापरामुळे ट्रान्सफॉर्मर व सबटेशनवर अतिरिक्त भार पडला आहे. त्यामुळे अशा ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या तसेच कमी दाबाने चलणे अशा वारंवार तक्रारी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे आल्या होत्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे जिल्हयातील ट्रान्सफॉर्मर जळणे, अतिरिक्तभार असलेल्या सबस्टेशन वरील भार कमी करणे, नविन फिटर तयार करणे याबाबतचा आढावा बैठक खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली. महावितरण विभागास टोल फ्री नं चालू करण्यात यावा. तसेच सर्व वरिष्ठ, कनिष्ठ अभियंता यांनी फोन चालू ठेवावेत व ग्राहकांच्या संपर्कात राहून कामे करावेत. त्यांना टाळा टाळ करू नये. ट्रान्सफॉर्मर गोडाऊनला सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. रोहित्र फेल झाले आहेत ते सात दिवसाच्या आत बदलून द्यावेत.

फेल झालेले ट्रान्सफॉर्मर वाहतूकीसाठी एजेंन्सी नेमुन 63 कीलो वॅट ट्रान्सफॉर्मर ला 2300/-, 100 कीलो वॅट ट्रान्सफॉर्मरला 4000/- वाहतूक देण्याचे शासनाने मान्य केले आहे. मात्र शेतकऱ्यांना रोहित्र बदलून घेण्याची घाई व आवश्यकता असल्याने ट्रान्सफॉर्मर स्वतः वाहतूक करून घेऊन येतात व जातात. अशा शेतकऱ्यांना महावितरणे वाहतूक खर्च एजेंन्सीच्या नावे टाकून देण्यात यावेत.

ज्या ट्रान्सफॉर्मरवर लोड आहे त्या ठिकणी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करणार आहोत. ज्या सबस्टेशनवर ओहरलोड आहे. अशा ठिकाणी अडिशनल पावर ट्रान्सफॉर्मर आवश्यक असेल तर तो प्रस्ताव वरिष्ठांनकडे पाठवावा.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एजेंन्सीला टार्गेट दिलेल्याप्रमाणे पूर्ण करावेत. व ज्या एजेंन्सीनी चांगल्या प्रकारे व पूर्ण कामे केली नाहीत अशा एजेन्सीकडील कामे काढून चांगल्या प्रकारे कामे करणाऱ्या एजेंन्सी देण्यात यावीत. तसेच शेतकऱ्यांनकडून सौरपंपासाठी पैसे घेऊ नये. जर पैसे घेतल्याची तक्रार आल्यास संबंधितांच्या बिलातून रक्कम कपात करण्यात यावी.

जिल्ह्यात एचव्हीडीस अंतर्गत 6210 कनेक्शन जोडणीचे होल्टास कंपनीस दोन वर्षे झाले कंत्राट देऊन परंतु आत्ता पर्यंत 2730 पूर्ण झाले आहेत. अद्याप 3480 बसवण्याचे शिल्लक आहेत. महावितरणने एजेंन्सीला येत्या 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुद्दतवाढ देण्यात आली आहे. दिलेले काम पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा.
यावेळी आ.कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुफ दिवेगावकर, मुख्य अभियंता लातूर श्री.कांबळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.श्रीकांत पाटील, कार्यकारी अभियंता श्री.वाघमारे, जिल्ह्यातील वरिष्ठ, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सोलापुरातील देगाव येथे आढळली मगर

triratna

‘सोलापूर विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ’

triratna

‘सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन’ या विषयावर सभा

prashant_c

सोलापूर ग्रामीण भागात १८ कोरोनाबाधित रुग्णाची भर

triratna

सोलापूर : माकपकडून गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन

triratna

सोलापूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा

triratna
error: Content is protected !!