तरुण भारत

गुरुवारी कोरोनाचे 17 नवे रुग्ण

36 हजार 525 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

गुरूवारी बेळगाव शहर व जिह्यातील 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एका बेळगाव शहरातील 10 जणांचा समावेश आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 25 हज्हार 900 वर पोहोचली असून अद्याप 36 हजार 525 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.

जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 25 हजार 300 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 258 सक्रिय रुग्ण आहेत. तर 351 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अद्याप 3 हजार 380 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.

गुरूवारी कॅम्प, काकती, शाहूनगर, टिळकवाडी, विजयनगर, विश्वेश्वरय्यानगर, महांतेशनगर व बिम्स्मध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 3 लाख 14 हजार 63 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून 2 लाख 83 हजार 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Related Stories

ता.पं.मध्ये आज अबकारी व पोलीस अधिकाऱयांची बैठक

Patil_p

चपाती-भाजी खा… पण बेळगावातच रहा!

Patil_p

कारवारमध्ये सरकारी ठेकेदारांची निदर्शने

Amit Kulkarni

विमानतळावर बसविण्यात आली अत्याधुनिक साहित्य तपासणी यंत्रणा

Patil_p

मिरज येथील कवी संमेलनात बेळगावच्या कवींचा सहभाग

Patil_p

पोलीस कॉन्स्टेबलचा निवृत्तीनिमित्त सत्कार

Patil_p
error: Content is protected !!