तरुण भारत

साईराज वॉरियर्स, विश्रृत स्ट्रायकर्सची विजयी सलामी

दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी लीग स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेन्ट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेला गुरुवारी शानदार प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी साईराज वॉरियर्स व विश्रृत स्ट्रायकर्स संघांनी विजयी सलामी दिली. साईराजचा रोहित पाटील व विश्रृत स्ट्रायकर्सचा रविचंद्र उकळी सामनावीरचे मानकरी ठरले. या दोघांनी अर्धशतके तसेच अनिष भूसद व दर्शन मयेकर यांनी भेदक मारा करीत चमक दाखविली.

युनियन जिमखाना मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. रवि पाटील, पुरस्कर्ते दीपक नार्वेकर, नासिर सनदी, विक्रम देसाई, जयसिंग रजपूत, गजानंद भांदुर्गे, विवेक पाटील, चेतन बैलूर, प्रमोद जपे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीपूजन केल्यानंतर त्यांना खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर्सने दैवज्ञ स्पोर्ट्स क्लबचा 5 गडय़ांनी पराभव केला. दैवज्ञ क्लबने 21.2 षटकांत सर्व बाद 104 धावा काढल्या. अखिलेश वेर्णेकरने 32, हर्ष फौजदारने 21, आदर्श कडेमनीने 11 धावा जमविल्या. साईराजच्या वैभव कुरिबागी, आकाश असलकर यांनी प्रत्येकी 2 तर मुदस्सर नझीर, सुनील कुरी, समर्थ शेट्टी यांनी एकेक बळी मिळविला. त्यानंतर साईराज वॉरियर्सने 16.4 षटकांतच विजयाचे उद्दिष्ट गाठताना 5 बाद 106 धावा जमविल्या. रोहित पाटील त्यांच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने 50 चेंडूत 7 चौकार, एक षटकारासह 59 धावा फटकावल्या. मुदस्सर नझीरने 18 व नंदन शिंदेने 10 धावा काढत त्याला चांगली साथ दिली. रोहितला दीपक नार्वेकर, स्वप्नील भडाळे, महेश फगरे, नासिर सनदी यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

दुपारच्या सत्रात झालेल्या दुसऱया सामन्यात पावसाचा व्यत्यय आला होता. पण सरस धावगतीच्या आधारे विश्रृत स्ट्रायकर्स संघाने गणेश हुबळी स्ट्रायकर्स संघावर 29 धावांनी विजय मिळविला. विश्रृत स्ट्रायकर्सने 25 षटकांत 9 बाद 171 धावा फटकावल्या. सलामीवीर रविचंद्र उकळीने 48 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांसह 68 धावा फटकावल्या तर ओम पाटीलने 30 धावा काढल्या. याशिवाय हार्दिक काटेने 19, सिद्धार्थ गोधवानीने 15, रोहित ढवळेने 12 धावा जमविल्या. हुबळी स्ट्रायकर्सतर्फे अनिष भूसदने 3, ऋषिकेश राजपूतने 2, ओंकार वेर्णेकर, आदर्श कडेमनी यांनी एकेक बळी मिळविला. त्यानंतर गणेश हुबळी स्ट्रायकर्सने 21 षटकांत 8 बाद 115 धावा जमविल्या असताना पावसास सुरुवात झाल्याने नंतर सरस धावगतीच्या आधारे सामन्याचा निकाल लावण्यात आला. त्यात विश्रृत स्ट्रायकर्सला 29 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. हुबळी स्ट्रायकर्सच्या सफल शेट्टीने 15, आदर्श कडेमनीने 15 धावा जमविल्या तर विश्रृततर्फे दर्शन मयेकरने 3 व हार्दिक काटेने 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे प्रशांत भादवणकर, विक्रम देसाई, जयसिंग रजपूत, चंदन कुंदरनाड, यांच्या हस्ते रविचंद्र उकळीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

आजचे सामने : विश्रृत स्ट्रायकर्स वि. दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब, स. 9.20 पासून मिलन वॉरियर्स वि. आनंद चॅलेंजर्स, दु. 1.30 पासून.

Related Stories

‘त्या’ पोलिसांचा गोगटे परिवाराकडून सत्कार

Patil_p

विद्यार्थ्यांविना महाविद्यालये झाली सुरू

Patil_p

बस्तवाड येथे भाताची गंजी जळून खाक : 30 हजाराचे नुकसान

Patil_p

विद्यार्थ्यांसाठी धान्य वाटप योजना सुरूच ठेवा

Amit Kulkarni

काकती येथे ऊस घेऊन जाणारा ट्रक्टर पलटी

Patil_p

काटगाळीनजीक अपघातात दोन ठार

Rohan_P
error: Content is protected !!