तरुण भारत

दुसऱया कसोटीतून कर्णधार विल्रयम्सन बाहेर

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

सध्या विंडीजचा संघ न्यूझीलंडच्या दौऱयात कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील होणाऱया दुसऱया कसोटीतून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने माघार घेतली आहे. येत्या काही दिवसांत विल्यम्सनची पत्नी पहिल्या अपत्याला जन्म देणार असल्याने विल्यम्सनने दुसऱया कसोटीसाठी आपण उपलब्ध होवू शकणार नाही, असे क्रिकेट न्यूझीलंडला कळविले आहे.

Advertisements

न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत विंडीजचा डावाने पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार विल्यम्सनने शानदार द्विशतक (251) झळकविले होते. कसोटीतील विल्यम्सनची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. उभय संघातील दुसरी कसोटी विंडीजच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आता दुसऱया कसोटीसाठी न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी लॅथमवर सोपविण्यात आली आहे. दुसऱया कसोटीत वॅटलिंगचे पुनरागमन होत आहे.

Related Stories

ओपेल्का उपांत्य फेरीत दाखल

Patil_p

टोकियोतील महिला टेनिस स्पर्धा रद्द

Patil_p

युवा टेटेपटू मानव ठक्कर जागतिक क्रमवारीत अव्वल

Patil_p

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये होणार

Patil_p

अन्वर अलीचा वैद्यकीय अहवाल एएफसीकडे दाखल

Patil_p

ऑस्ट्रेलियातील मदतनिधी सामन्यात लारा खेळणार

Patil_p
error: Content is protected !!